*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**बंगाली ढाक आणि ढोल ताशाच्या गजरात रंगली माता कालीची मिरवणूक**श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाचा समारोप*
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज* *बंगाली ढाक आणि ढोल ताशाच्या गजरात रंगली माता कालीची मिरवणूक* *श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाचा समारोप* पुणे : पश्चिम बंगालच पारंपारिक वाद्य ढाक चे आकर्षक सादरीकरण त्यात ढोल ताशांचा निनाद,पारंपारिक बंगाली वेशभूषा करून सहभागी झालेल्या महिला व पुरूष अशा प्रसन्न वातावरणात माता काली च्या मूर्तीची मिरवणूक थाटात पार पडली. निमित्त होते बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाच्या समारोपाचे. बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाच्या समारोपा निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीची सुरुवात आर.सी.एम हायस्कूल फडके हौद,कसबा पेठ ते वृद्धेश्वर घाट येथे संपन्न झाली.यावेळी पुणे शहर सार्वजनिक काली पूजा कमिटीचे सेक्रेटरी सुब्रतो मजुमदार, विनोद संतरा- खजिनदार ,अमर माझी-उपसेक्रेटरी ,अनुप माईती - सदस्य , महादेव माझी - सदस्य ,पूनचंद्र दास- सदस्य, संकेत मजुमदार आदि मान्यवरांसाह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मातृशक्तीचे ...