*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पिंपरी चिंचवड शहर ओबीसी कार्यकारिणी जाहीर*
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*
*पिंपरी- चिंचवड*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ओबीसी विभाग पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) वतीने शरातील पदाधिकारी यांची नियुक्ती शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या मार्गदर्शनात माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते तसेच कार्याध्यक्ष फजल शेख, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड.सचिन औटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुतन कार्यकारिणी पद वाटप समारंभ मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी,पिंपरी येथे पार पडला, यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, संघटन सचिव अशी पदे देण्यात आली असून, ओबीसी विभागाचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची ताकद पक्षास मिळाली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षश्रेष्ठींकडून अभिनंदन करण्यात आले आहे. आगामी काळात जनसंपर्क वाढवणे आणि पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे, असा निर्धार यावेळी सर्व पदाधिकारी यांच्याकडून व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती ओबीसी शहर अध्यक्ष प्रशांत महाजन यांनी यावेळी दिली.
तरी सदर बातमीस आपल्या लोकप्रिय प्रसिद्धीमाध्यमातून प्रसिद्धी देण्यात यावी.
कळावे,
आपला स्नेहांकित,
प्रशांत महाजन
अध्यक्ष ओबीसी विभाग
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)
सोबत :- ओबीसी विभाग कार्यकारिणी