*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**सुनेत्रा पवारांची भीमथडी जत्रेला खास भेट; जीआय मानांकित उत्पादनांचा घेतला आस्वाद*
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने आयोजित प्रसिद्ध 'भीमथडी जत्रे'ला सौ. सुनेत्राताई पवार यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी महिला बचत गटांच्या स्टॉल्सवर जाऊन विविध वस्तूंची आणि कलाकुसरीच्या साहित्याची पहाणी करून कौतुककेले आणि मनसोक्त खरेदीही केली. विशेष म्हणजे, या वर्षी भीमथडीजत्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या 'जीआय' (GI - भौगोलिक मानांकन) प्राप्त शेती उत्पादनांच्या दालनाला त्यांनी आवर्जून भेट दिली. तेथील विविध वैशिष्ट्यपूर्ण कृषी उत्पादनांची माहिती घेत त्या शेती उत्पादनांची चवही चाखली. महिलांच्या कष्टाला आणि ग्रामीण संस्कृतीला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमाचे व शेतकऱ्यांच्या नवनिर्मितीचे त्यांनी भरभरून कौतुक केले.