*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**पाणी व घरगुती संसाधन व्यवस्थापनात महिलांची भूमिका महत्त्वाची**पर्यावरणतज्ञ डॉ. गुरूदास नूलकर यांचे मत**द एम्पॉवरहर फाउंडेशन तर्फे जलसंवर्धन व शाश्वत जीवनशैलीविषयी मुलींना मार्गदर्शन*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*
*पाणी व घरगुती संसाधन व्यवस्थापनात महिलांची  भूमिका महत्त्वाची*
*पर्यावरणतज्ञ डॉ. गुरूदास नूलकर यांचे मत*
*द एम्पॉवरहर फाउंडेशन तर्फे  जलसंवर्धन व शाश्वत जीवनशैलीविषयी मुलींना मार्गदर्शन*

पुणे, दि. 23  : 
“महिलांनी संसाधन व्यवस्थापनात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे . तसेच पाणी आणि घरगुती संसाधन व्यवस्थापनात त्यांची पारंपारिक भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांना योग्य माहिती व संधी मिळाल्यास, त्या ही भूमिका पुढेही निभावू शकतात,”असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्सच्या शाश्वत विकास केंद्राचे संचालक डॉ. गुरूदास नूलकर यांनी व्यक्त केले. 

द एम्पॉवरहर फाउंडेशन तर्फे पर्यावरणाचे महत्त्व, शाश्वत विकासाची गरज या विषयावर डेक्कन जिमखाना क्लब हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी द एम्पॉवरहर फाउंडेशन चे संस्थापक व प्रमुख विश्वस्त आणि भाषातज्ञ संदीप नूलकर हे होते. तसेच खजिनदार ऋषिकेश अत्रे, संचालिका रूपाली शिंदे - आगाशे, सहसंचालिका तन्मयी खिरे उपस्थित होते. 
डॉ. गुरूदास नूलकर म्हणाले,"  पुण्यातील पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत  आहे. पाण्याचा अतिवापर आणि  लोकांच्या दैनंदिन जीवनातील पाणीवापरात रासायनिक प्रसाधनांचे वाढते प्रमाण यामुळे पाण्याची उपलब्धता आणि गुणवत्ता धोक्यात आली आहे.  प्रत्येक व्यक्तीस आवश्यक असलेल्या १५० लिटर पाण्यापैकी १४० लिटर नदीत मलिनपाण्याच्या रूपात जाते. त्यामुळे नद्या आजारी झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून रिव्हर्स फ्रंट डेव्हलपमेंट ऐवजी जल शुद्धीकरण प्रकल्प राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. यातूनच पुनर्वसनासाठी स्वच्छ व मुबलक पाणी  उपलब्ध होईल."
"आपल्या दैनंदिन सवयींमध्ये केलेले छोटे बदल पाण्याच्या अपव्ययास मोठ्या प्रमाणात कमी करू शकतात आणि या उपक्रमांचे मुख्य प्रभावक महिलाच ठरू शकतात.” असेही ते म्हणाले.
संदीप नूलकर म्हणाले, "  या व्याख्यानाचा उद्देश केवळ पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती देणे हा नाही. तर लाभार्थी मुलींना अधिक जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रेरणा देणे आहे. द एम्पॉवरहर फाउंडेशन ही संस्था फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना तातडीच्या गरजा भागवण्यापुरती मदत करत नाही तर
दीर्घकालीन बदल घडवणे हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे मुली गरीबीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडून चांगले आयुष्य घडवण्यास सक्षम होतील.”
याप्रसंगी  संस्थेच्या वतीने लाभार्थी मुलींना शालेय साहित्याचे  वाटप करण्यात आले.
 सूत्रसंचालन व आभार संहिता चांदोरकर यांनी केले. 
- द एम्पॉवरहर फाउंडेशन

000000

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*दि २४ मार्च २०२५ रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ग्रँट मेडिकल फाउंडेशन चे रुबी हाॅल क्लिनिक यांच्या मधे एक सामंजस्य करार करण्यात आला.

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना कार्यकर्ता अनिता परदेशी यांची घेतली सांत्वनपर भेट**भाच्याच्या आत्महत्येमुळे व्यक्त केला शोक*