*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन आनंदात साजरा होणार* *तब्बल वीस लाख लोकांचे नियोजन*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*

*भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन आनंदात साजरा होणार* 
*तब्बल वीस लाख लोकांचे नियोजन*
पुणे : 
1 जानेवारी 2026 रोजी मौजे पेरणे येथे होणारा 209 वा भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होणार आहे.  जिल्हा प्रशासनाने यासंदर्भामध्ये सुमारे वीस लाख भीम अनुयायांना सर्व पायाभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केलेली असून त्यामुळे जास्तीत जास्त आंबेडकरी अनुयायांनी या सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ दिन समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले आहे.

अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना पिण्याचे पाणी पार्किंग शौचालय यासह सर्वच पायाभूत सुविधा दरवर्षीपेक्षा अधिक संख्येने पुरविण्यात येणार आहेत या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखालील समिती समवेत समाजबांधवांच्या व समन्वय समितीच्या सहा पेक्षा अधिक बैठका पार पडलेल्या आहेत, या बैठकांमध्ये नागरिकांकडून प्राप्त सूचनांच्या आधारे अंतिम नियोजन करण्यात येत असून यावर्षीचे नियोजन अधिक दर्जेदार व सुविधा नियुक्त राहणार आहे समाजकंटक व चोरट्या लोकांवर लक्ष केंद्रित करून त्यांचा उपद्रव उत्सवावर होऊ नये यासाठी पुणे पोलीस आयुक्तालय तर्फे पहिल्यांदाच ड्रोन द्वारे फेस स्कॅनिंग यंत्रणाचा वापर करून कारवाई करण्यात येणार आहे. अनुयायांची संख्या लक्षात घेता व यापूर्वीच्या घडलेल्या अप्रिय घटनेच्या बाबींची माहिती लक्षात ठेवून तब्बल 13 हजार पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त पुणे शहर व पुणे ग्रामीण या दोन्ही मार्फत या ठिकाणी पुरवण्यात येणार आहे. नागरिकांना सुरक्षितता व गोंधळाची परिस्थिती निर्माण न होऊ देणे या बाबीला प्राधान्यक्रम देत सुरक्षा व्यवस्थेसंदर्भामध्ये देखील पोलिसांनी सर्वतोपरी खबरदारीच्या उपायोजना केल्या आहेत.

*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवंदनेचे  शताब्दी वर्ष*
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव विजय स्तंभाला भेट देण्याच्या घटनेला पुढील वर्षी 100 वर्षे पूर्ण होत असल्याने यंदाचे वर्ष हे बाबासाहेबांच्या मानवंदनीची शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाणार असून याची सुरुवात एक जानेवारी रोजी होत आहे, यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत विजय स्तंभावर अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांचे कुटुंबीय यांचे संयुक्त अभिवादन विजय स्तंभाला करण्याचा विशेष कार्यक्रम यावेळी घेण्यात आलेला आहे.

 *महार रेजिमेंट ची मानवंदना*
 शौर्यस्तंबावरून महार रेजिमेंट ची स्थापना करण्याची मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 साली केली होती या घटनेच्या अनुषंगाने दरवर्षी महार रेजिमेंटचे निवृत्त सैनिक या ठिकाणी लष्करी इत मामा मानवंदना देत आहेत यावर्षी यशसिद्धी आजी माजी सैनिक फाउंडेशन च्या वतीने सुमारे 3000 निवृत्त सैनिकांची मानवंदना महाराजांवर राष्ट्रगीताद्वारे दिली जाणार आहे. 

*मान्यवर येणार अभिवादनाला*
 दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील अभिवादनासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर शौर्य दिन कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून यात प्रामुख्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री  रामदासजी आठवले, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष   प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे, भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे  सुरेश माने, भारतीय दलित कोब्राचे भाई विवेक चव्हाण, खासदार चंद्रशेखर आझाद, खासदार चंद्रकांत हंडोरे खासदार, खासदार छत्रपती संभाजी महाराज, माजी मंत्री नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत यावेळी भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने सुमारे एक लाख अनुयायांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी अभिवादन सभा सांस्कृतिक कार्यक्रम व प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आलेले आहे असे राहुल डंबाळे यांनी सांगितले.

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*दि २४ मार्च २०२५ रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ग्रँट मेडिकल फाउंडेशन चे रुबी हाॅल क्लिनिक यांच्या मधे एक सामंजस्य करार करण्यात आला.

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना कार्यकर्ता अनिता परदेशी यांची घेतली सांत्वनपर भेट**भाच्याच्या आत्महत्येमुळे व्यक्त केला शोक*