*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना कार्यकर्ता अनिता परदेशी यांची घेतली सांत्वनपर भेट**भाच्याच्या आत्महत्येमुळे व्यक्त केला शोक*
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*
*भाच्याच्या आत्महत्येमुळे व्यक्त केला शोक*
*पुणे*
विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना वडगाव शेरी समन्वयक व क्षेत्र प्रमुख अनिता परदेशी यांची त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली. अनिता परदेशी यांच्या भाच्याने अलीकडेच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून, त्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी ही भेट देत त्यांचे सांत्वन केले.
या भेटीत डॉ. गोऱ्हे यांनी कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होत त्यांना धीर दिला आणि अशा प्रसंगी मानसिक आधार देणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आत्महत्येच्या घटना समाजासाठी चिंता निर्माण करणाऱ्या आहेत आणि त्यावर समाजाने एकत्रितपणे उपाय शोधायला हवेत, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी स्त्री आधार केंद्राच्या ट्रस्टी जेहलम जोशी, अनिता शिंदे, तसेच शिवसेना पदाधिकारी धनंजय जाधव, युवराज शिंगाडे, अक्षता धुमाळ उपस्थित होते.