*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*
  *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे  तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*  

*पुणे*

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी दिनांक ९/१/२०२५ रोजी सर्किट हाऊस,पुणे येथे पदाधिकारी व नागरिकांच्या भेटी घेतली. यावेळी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण करावी असे निवेदन देत मागणी केली. 
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने झालेल्या लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीमध्ये जोमाने व प्रामाणिकपणे काम करीत महायुती सरकारला अधिक बळकट केलेलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे सन १९५० पासून अस्तित्वात आलेल्या पुणे शिक्षण मंडळाची मुदत दिनांक १४ मार्च २०१७ रोजी संपुष्टात आल्याने बरखास्त करण्यात आले. सुरवातीला महापालिकेत समाविष्ट असलेल्या शिक्षण मंडळाचा कारभार नंतर स्वतंत्र करण्यात आला होता. शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते यांना समितीवर अध्यक्ष, सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळत असे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना सामाजिक, राजकीय क्षेत्रात वाटचाल करण्यास फायदा होत असे. आता मात्र शिक्षण मंडळ अस्तित्वात नसल्याने त्यावर पक्षातील पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष, सदस्य पदावर नेमणूक करता येत नाही. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुणे शिक्षण मंडळ, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासद म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यास पक्षातील कार्यकर्त्याला न्याय मिळेल व पक्ष वाढीसाठी मदत होईल.  
 
आपला,
श्री. दीपक माधवराव मानकर 
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे.

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**नवीन मराठी शाळा व साईनाथ ट्रस्टचे आषाढी वारीनिमित्त भव्य रिंगण सोहळ्यात खराखुरा अश्वही धावला*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**बिबवेवाडीतील डोंगरमाथ्याचे आरक्षण उठविण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती* *आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नांना यश*