Posts

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**अॅड.अभय छाजेड यांची ;ओरिसात निरीक्षकपदी नेमणूक!*

Image
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *अॅड.अभय छाजेड यांची ; ओरिसात निरीक्षकपदी नेमणूक!* *पुणे* ओरिसामधील बालासोर लोकसभा मतदार संघासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांची अ. भा. कॉंग्रेस पक्षातर्फे निवडणूक निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. ओरिसामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी होत असून बालासोर मतदार संघात ७ विधानसभा मतदार संघ आहेत. माजी केंद्रीयमंत्री श्रीकांत जेना हे कॉंग्रेस पक्षाचे तेथे उमेदवार आहेत.बालासोर लोकसभा मतदार संघात अखेरच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे पुणे लोकसभा मतदार संघातील जबाबदारी संपवून अॅड.अभय छाजेड ओरिसातील बालासोर येथे रवाना झाले.

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**ठाकूर अनुप सिंग साकारणार "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज"*

Image
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *ठाकूर अनुप सिंग साकारणार "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज"*  *पुणे* - पुणे येथे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यात अवतरले शंभूराजे - मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज" महाराष्ट्राचा महासिनेमा "सरसेनापती हंबीरराव" या चित्रपटाच्या भव्य यशानंतर उर्विता प्रॉडक्शन्सने भव्य आणि बिग बजेट अशा "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज" या चित्रपटाची घोषणा केली होती. सुरुवातीपासूनच अत्यंत गोपनीयता पाळल्याने छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका कोण साकारणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, त्यातच श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरने ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत पुणे येथे संस्थापक, अध्यक्ष नवनाथ पठारे पाटील यांच्या सूर्योदय प्रतिष्ठान आयोजित भव्यदिव्य अशा सोहळ्यात हजारो शिवशंभू भक्तांच्या उपस्थितीत  &

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**विश्वासराव गांगुर्डे याचे निधन* *माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.**(वय 80)*

Image
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *विश्वासराव गांगुर्डे याचे निधन*  *माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.* *(वय 80)* *पुणे* त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे. विश्वासरावांचे वडील कृष्णराव गांगुर्डे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अतिशय जवळचे स्नेही होते. त्यामुळे विश्वासरावांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सहवास लाभला. १९७८ मध्ये दत्तवाडी- राजेंद्रनगरमधून ते पहिल्यांदा पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर १९९२-१९९७ काळात गणेशखिंड भागातून नगरसेवक पद भुषविले.  विश्वासराव हे विचारवंत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ते नेहमीच पुरस्कर्ते होते. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर आणीबाणी विरोधात त्यांनी मोठा संघर्ष उभा केला. १९९२-१९९५ या काळात ते पुण्याचे शहराध्यक्ष होते. भाजपा शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाचे काम पुणे शहरात तळागाळापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले.  १९८०-८५ आणि १९८५-९० दोनवेळा पर्वती विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र दुर्दैवाने त्यांना पराभवाचा सामना कर

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**मतदान हीच आपली ताकद, हीच आपली जबाबदारी !**कलर्स मराठीच्या लोगोमध्ये बदल ..* *कलाकारांनी व्हिडिओंद्वारे मतदारांना केले आवाहन*

Image
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *मतदान हीच आपली ताकद, हीच आपली जबाबदारी !* *कलर्स मराठीच्या लोगोमध्ये बदल ..*  *कलाकारांनी व्हिडिओंद्वारे मतदारांना केले आवाहन* *मुंबई* कलर्स मराठी वाहिनीने नुकताच आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब लोगोमध्ये बदल केलेला दिसत आहे. बदललेल्या नव्या लोगोमध्ये एका बोटावर शाई लागलेली दिसतेय, ज्यामुळे मत दिल्याचे सूचित होत आहे. मागील काही वर्षात मतदानाचा टक्का फार कमी झाला आहे. या नव्या लोगोच्या बदलामुळे लोकांमध्ये मतदानाचे महत्त्व आणि एक स्थिर देशासाठी त्याची आवश्यकता याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा कलर्स मराठीचा उद्देश आहे. कलर्स मराठीने नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक कार्यात आपले योगदान दिले आहे. नुकतेच कलर्स मराठीच्या कलाकारांनी इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरून विविध व्हिडिओंद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदान करण्यासाठी बाहेर या , वोटिंग करणे हा तुमचा हक्क आणि जबाबदारी आहे. देशासाठी एक पाऊल उचलून मतदान करा. आपल्या एका मताने देशाचे कल्याण होईल. मतदार हे टीव्ही आणि सोशल मीडियाचा वापर अधिक प्रमाणात करतात, हीच गोष्ट लक्षा

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'मल्हार' येतोय भेटीला मराठी, हिंदी भाषेत होणार प्रदर्शित*

Image
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'मल्हार' येतोय भेटीला  मराठी, हिंदी भाषेत होणार प्रदर्शित*   *मुंबई* व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.  ३१ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे.  ‘मल्हार’चे पोस्टर आणि शीर्षकाची झलक पाहून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असेल ! ही कथा गुजरात प्रदेशामधील कच्छच्या ग्रामीण भागात घडत असून तीन वेगवेगळया कथा येथे घडताना दिसणार आहेत. ज्या एकमेकांशी संबंधित आहेत. पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल नक्कीच उत्सुकता निर्माण झाली असेल, याची खात्री आहे.  ‘मल्हार’चे निर्माते प्रफुल पासड असून या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, ऋषी सक्सेना, बालकलाकार श्रीनिवास पोकळे, विनायक पोतदार, मोहम्मद समद, अक्षता आचार्य आणि रवी झंकाळ प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल कुंभार यांनी केले आहे.  या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशा

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'विद्यापीठांच्या वित्तीय बाबी*'*या विषयावरील मार्गदर्शनपर कार्यशाळेचे उद्घाटन*

Image
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'विद्यापीठांच्या वित्तीय बाबी*' *या विषयावरील मार्गदर्शनपर कार्यशाळेचे उद्घाटन* पुणे: - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व उच्च शिक्षण संचालनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'विद्यापीठांच्या वित्तीय बाबी' या विषयावरील दोन दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात सुरू असलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री.  विकास चंद्र रस्तोगी,  उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी, प्र- कुलगुरु प्रा. (डॉ.) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) विजय खरे, सुकाणू समिती सदस्य श्री. अनिल राव आदी मान्यवरांच्या  उपस्थिती उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी डॉ. प्रशांत मगर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. नवीन शैक्षणिक धोरण अं

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**विविध उपक्रमांसह टीजीएच-ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा*

Image
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग  पेज* *विविध उपक्रमांसह टीजीएच-ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा* *तळेगाव* - परिचारिकांच्या योगदानाचे स्मरण आणि आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आज (12 मे) आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने तळेगाव येथील टीजीएच-ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून परिचारीकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी रूग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक श्री . सचिन देशमुख, ग्रुप स्ट्रॅटेजी अँड बिजनेस डेव्हलपमेंट हेड डाँ.संतोष साहू, डाँ.अभिषेक पुरकायस्थ,डाँ.विश्वास कौल, डाँ.मृणाल परब, डाँ.ज्योती मेहता, डाँ. अमोल मदने, डाँ.संगीता पाटील तसेच रूग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. टीजीएच-ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे आंतरराष्ट्रीय परिचारीका दिनानिमित्त प्रश्नमंजुषा, पोस्टर मेकींग, बेस्ट ड्रेस स्पर्धा, बेस्ट वर्कर ऑफ द मंथ, मनोरंजनात्मक खेळ,रांगोळी स्पर्धेसह केक कापून हा दिवस साजरा