*साप्ताहिक पुणे प्रवाह**शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे जेष्ठ विचारवंत विकास पासलकर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश करणार*
*साप्ताहिक पुणे प्रवाह*
*शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे जेष्ठ विचारवंत विकास पासलकर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश करणार*
पुणे:
मी गेली २५ वर्ष शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर या विचाराने सामाजिक कार्य करत आहे, याची आपल्याला जाणीव आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, तसेब कुणबी मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यरत अनेक संस्थांचरोबर समाज विकासाचे काम केले आहे. तसेच शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ मासाहेब तसेच इतर महामानवांच्या जयंती उत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून यशस्वीरित्या पार पाडले आहे. सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी सर्व जाती धर्माना एकत्रित घेऊन विधायक काम करण्याची माझी भूमिका राहिलेली आहे. हे सामाजिक काम करत असताना समाजप्रबोधनाबरोबर लोकांचे प्रश्न घेऊन अनेक आंदोलन केली, मराठा आरक्षण, बेरोजगारी शेतकर्याचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण वाहतूक व्यवस्था, अशा अनेक लोकांच्या प्रश्नावर आंदोलन केली, स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकरांचा वारसा घेऊन काम करत असताना, अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आलो आहे. सामाजिक शांतता व दंगलमुक्त देश सहावा यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. हे सर्व करीत असताना सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राज्यकर्त्याकडे
जाण्याशिवाय पर्याय असायचा नाही, लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा राजसत्ता हा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. जीवनाच्या या टप्यावर सामाजिक परंपरा, वारसा सोबत घेऊनच राजकीय काम करण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी गेली अनेक वर्ष राज्याच्या राजकारणामध्ये धडाडीचा लोकनेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते माननीय अजित दादा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम शुक्रवार दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ठिक ४.०० वाजता पुणे येथे पार पडणार आहे, या सोहळ्यास माझ्या बरोबर गेल्या २० ते २५ वर्षापासून अखंड प्रामाणिकपणे कार्यरत असणारे तसेच माझ्यावर प्रेम करणारे आणि एकनिष्टपणे मला साथ देणारे पुणे, बारामती, पुरंदर, दौंड, इंदापुर, हवेली, खेड, आळंदी, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ तसेच तमाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील आणि हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक व इतर राज्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे। रथी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत विकास पासलकर यांनी माहिती दिली