*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**पुण्यात २०२५ पर्यंत केमेस्ट्रीच एक चाप्टर उघडला जाईल**४३ व्या इंडियन काऊंसिल आँफ केमिस्टचा परिपाक*
*पुणे*
गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात इंडियन काऊंसिल आँफ केमिस्टची ४३वी तीन दिवसीय परिषद पार पडली. परिषदेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रा. सुरेश गोसावी, महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण अधिकारी डॉ. शैलेंद्र देवळणकर, डायरेक्टर ऑफ रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल एनर्जी एमेरीटस प्रोफेसर आयआयएसइआर पुणे चे डॉ. सतीशचंद्र ओगले, पीइसो सोसायटीचे बिझनेस कौन्सिल चे चेअरमन डॉ. गजानन एकबोटे, पी ई सोसायटीचे सहकार्यवाह डाॅ जोत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित, पूना गुजरात केळवण मंडळाचे चेअरमन श्री. राजेशभाई शहा चोखावला, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ संजय खरात, एच. व्ही देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे रसायनशास्त्र प्रमुख प्रा. डॉ. नीलिमा राजूरकर हे उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डाॅ एकबोटे म्हणाले,'
मूलभूत विज्ञान विषयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत आहे. त्याचा विज्ञान संशोधनावर विपरित परिणाम होऊन देशपातळीवर संशोधनामधे घट होईल. केंद्रीय, राज्य व महाविद्यालयीन शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६% खर्च होणे अपेक्षित आहे. तो तसा होत नसल्याने याची कात्री शिक्षकांच्या नेमणुकांवर होत आहे.'
या परिषदेमध्ये ४०० पेक्षा जास्त संशोधकांनी सहभाग घेताला. १९८ पेक्षा जास्त रिसर्च पेपर व पोस्टर्स प्रेझेंट झाले.
या प्रसंगी प्रा डी. अशोक यांना ग्रीन मेडीसिन अँड केमिकल केमिस्ट्री या क्षेत्रात संशोधन केल्याबद्दल लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या बरोबरच ८ संशोधकांना विविध क्षेत्रातील संशोधन कामगिरी बद्दल पुरस्कार देण्यात आले.
आयसीसी च्या 43 व्या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी प्रा. किशोर राजदेव , प्रा. सतीश के. परदेशी, प्रा. राजन डे , एन. पारेख, प्रा. भालचंद्र एम. भानगे,प्रा र. न. जडेजा, प्रा बी बी वी शैलेजा , डॉ. पी नं. शर्मा ,प्रा रत्नमाला बेंद्रे ,प्रा संतोष के. हराम, प्रा रमेश ल गरदास, प्रा पन्नूरूर वेंकटासू ,प्रा अरविंद कुमार प्रा अरुण प्रताप, प्रा आर. एन. पटेल , प्रा. अकेल्ला शिवरामकृष्णा , प्रा.शिवराम एस.गरजे यांची रसायन शास्त्रातील विविध विषयांवर व्याख्याने झाली.
यानंतर "सोसायटल अँप्लिकेशन आँफ न्युक्लिअर सायन्स अँड टेक्नाॅलाॅजी" या विषयावर सिंपोझिअम झाले.याचे उद्घाटन भाभा ऍटोमिक रिसीरच सेंटर चे डॉ पी. के. पुजारी फॉर्मर डायरेक्टर यांच्या हस्ते झाले.
यानंतर
१. डॉ नीलिमा राजूरकर (सेकशनल प्रेसिडेंट )
रेडिओफार्माकुटिकल्स फॉर हेल्थ केअर केअर
२. डॉ संजय ढोले - डिझाईन अँड डेव्हलोपमेंट ऑफ नुक्लिअर बॅटरी युसिंग रेडिओऍक्टिव्ह सौरस फॉर लो पॉवर एनर्जी सप्लाय
३. डॉ रघुनाथ आचार्य -
इंडस्ट्रियल अँड सोसायटेल अँप्लिकेशन्स ऑफ नुक्लिअर अनेलेटिकल आयसोटॉप हायड्रॉलॉजी अँड रेडिओ ट्रेसर टेकनिक्स.
४. डॉ पी.ए. हसन.-
अँप्लिकेशन ऑफ नुक्लिअर सायंस इन अग्रीकलचर अँड रेडिओट्रेसर टेकनिकस
५.डॉ. ए. व. र. रेड्डी -
युटीलायझेशन ऑफ रेडिएशन फोर इन्हान्समेंट ऑफ कलर अँड नुक्लिअर टेक्निक्स इन द स्टडी ऑफ जेम्स्टोनसं.
यांची व्याख्याने झाली.
याशिवाय ३७ पुरस्कार देण्यात आले.
परिषदेचा समारोप डाॅ सुनिल भागवत, संचालक,आयसर पुणे, डाॅ मनोहर चासकर, कुलगुरु, एस आर टी एम विद्यापीठ,प्रा सुरेश तोडकर, सहकार्यवाह, पी ई सोसायटी, डाॅ निवेदिता एकबोटे, उपकार्यवाह, पी ई सोसयटी, डाॅ प्रकाश दिक्षीत, उपकार्यवाह, पी ई सोसयटी यांच्या उपस्थितीत झाला.
या प्रसंगी बोलताना डाॅ सुनिल भागवत म्हणाले, " केमिस्ट्रीचा उपयोग पुढे अन्नधान्य पिकवण्यासाठी, जगण्यासाठी सतत होणार आहे. ही सतत लागणारी गोष्ट आहे. केमेस्ट्रीला न घाबरता याचा उपयोग करा."
डाॅ मनोहर चासकर मार्गदर्शन करताना म्हणाले, " बुधिमत्ता,ज्ञान तुम्हांला चौकट देईल व अशा परिषदा ज्ञान जगासमोर सादर करायला मदत करतात. जगातील आरोग्य, शेती, पर्यावरणाच्या अडचणी सोडविण्यास केमिस्ट मदत करतील. तीन एच हँड,हेड अँड हार्ट एकत्र येऊन काम करतील."
डाॅ निवेदिता एकबोटे," आपले अयु़ष्य हे रसायनशास्त्र आहे. शिक्षण क्षेत्र बदलत चालले आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य आत्मसाद केल्याशिवाय पर्याय नाही. आणि शिक्षकांना वेगवेगळे पर्याय शिकून शिकवावे लागतील."
प्रा डाॅ रणजित वर्मा, प्रेसिडेंट ," हि परिषद रसायन शास्त्रातील संशोधकांना प्रोत्साहन देणारी आहे. प्रत्येक क्षेत्रातील लहानात लहान भाग हा केमिस्ट्री आहे.त्यासाठी आम्ही केमस्ट्रीसाठी वेगवेगळे चाप्टर्स उघडणार आहोत. एआय व केमेस्ट्रीशी संबंधित वेगवेगळे अभ्यासक्रम राबविणार आहोत. पुण्यातील केमेस्ट्री चाप्टर २०२५ जाईल अशी घोषणा त्यांनी केली.
वेगवेगळे संशोधन कळले, विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग, वेगवेगळ्या संशोधकांशी चर्चा करण्याची संधी मिळाली असे सहभागी संशोधकांनी सांगितले. प्रा एस के परदेशी यांनी परिषदेचा अप्रतिम अनुभव आला असे सांगितले.
डाॅ कमल बॅनर्जी, अॅनालिटिकल केमस्ट्री,डाॅ पटेल, इन आॅर्गेनिक , डाॅ बिरय्या आॅरगॅनिक केमस्ट्री, प्रा दिलीप तगडे फिजिकल केमस्ट्री व डाॅ निलिमा राजुरकर यांनी सिंपोझिअमचा अहवाल सादर केला.
डाॅ रणजित वर्मा, प्रेसिडेंट, आयसीसी,
डाॅ गरीश सस्केना, आयसीसी, एक्स व्हाईस चान्सलर, प्रा राजेश ढाकरे, सेक्रेटरी, आयसीसी, प्रा राजेंद्र गुरव, प्राचार्य, एच,व्ही, देसाई काॅलेज, प्रा जी एस गुगळे, एच,व्ही, देसाई काॅलेज हे उपस्थित होते.
प्रा प्रगती अंभ्यकर यांनी सुत्रसंचलन केले.प्रा मनीषा माटेगावकर व प्रा मोहिनी गुप्ते यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली.
माॅडर्न महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचा सहभाग होता.
प्राचार्य
डाॅ संजय खरात
अधिक माहितीसाठी
डाॅ मंजुषा कुलकर्णी