*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**मंत्रालयासमोर अर्ध नग्न लक्षवेधी चित्र आंदोलन ६ पासून**शासन व सत्ताधारी राजकीय मंडळी राहतील आत्महत्येस जबाबदारः चित्रकार माने यांचा इशारा*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*


*मंत्रालयासमोर अर्ध नग्न लक्षवेधी चित्र आंदोलन ६ पासून*
*शासन व सत्ताधारी राजकीय मंडळी राहतील आत्महत्येस जबाबदारः चित्रकार माने यांचा इशारा*

पुणे ४ ऑक्टोबरः 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेची अंमलबजावणी न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करणे, व्यवसायासाठी आत्मनिर्भर भारत योजनेतून कर्ज मिळणे व शासकीय व राजकीय स्तरावर गेल्या ५ वर्षापासून माझी दखल का घेतली नाही. या सर्व मागण्यांसहित येत्या ६ ऑक्टोबर पासून मुंबई येथे मंत्रालयासमोर पंतप्रधान मोदी यांच्या चित्रासहित अर्ध नग्न लक्षवेधी चित्र आंदोलन करणार आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही याची दखल घेतली नाही तर माझ्या आत्महत्यास शासन व राजकीय मंडळी जबाबदार राहतील. असा इशारा जगद्गुरू संत तुकाराम महाराज व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तैल चित्र काढणारे देहू येथील ज्येष्ठ चित्रकार प्रेम माने यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
वरील विषयाला अनुसरून २०२४ ला पुणे जिल्हाधिकारी यांना ३५ पानांचे निवेदन दिले होते. परंतू आजपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. प्रधानमंत्री मोदी यांच्या सुंदर स्वप्नातील विकसीत आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बँक व सत्ताधारी पार्टीतील काही पदाधिकारी यांच्याकडून प्रचंड विरोध होत असून पंतप्रधानांच्या आदेशाला पायदळी तुडविले जात आहे. 
वास्तव आर्ट या बंद पडलेल्या व एनपीए झालेल्या माझ्या व्यवसायासाठी आत्मनिर्भर भारत योजनेतून १ कोटी रुपये कर्ज मागणी केली होती. बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत झालेल्या मिटींग मध्ये मला १० लाख रुपये कर्ज देण्याचे मान्य केले. परंतू स्थानिक बँक मॅनेजरने कर्ज मंजूर केले नाही. त्याच प्रमाणे माझा स्वर्गवासी मुलगा जो १०० टक्के दिव्यांग होता. त्याच्या नावे पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अपंग बिज भांडवल योजनेतून दिड लाख रुपयांची कर्ज मागणी केलेली बँकेनी नाकारली. याचे कारण अद्याप समझले नाही. २८ मे २०२४ रोजी पत्नी कामिनी माने हिने प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून बँक ऑफ महाराष्ट्र देहूगाव शाखेतून २ लाख रुपये कर्ज मागणी केली होती परंतू बँकेने ते ही नाकारले. अशा प्रकारे वारंवार बँकेने माझे कर्ज का नाकारले हे अद्याप कळाले नाही.
चित्रकार प्रेम माने यांनी आरोप केला की, बँकेच्या कर्ज अडवणुकीमुळे माझ्या व्यवसायाचे प्रत्यक्ष १० कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या आर्थिक नुकसानीमुळे उपचारा अभावी माझ्या दिव्यांग मुलाला गमवावे लागले. याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यामुळे माझी मागणी आहे की बँकेने आमचे अडवून ठेवलेले कर्ज तातडीने मंजूर करावे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्या कर्जासाठी बँकेला हमी पत्र दयावे व तातडीने कर्ज मिळवून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. 


ज्येष्ठ तैल चित्रकार
श्री. प्रेम माने, देहू, पुणे
मो. नं.९९२२०२५५३२

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**पुण्यात २०२५ पर्यंत केमेस्ट्रीच एक चाप्टर उघडला जाईल**४३ व्या इंडियन काऊंसिल आँफ केमिस्टचा परिपाक*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*दि २४ मार्च २०२५ रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ग्रँट मेडिकल फाउंडेशन चे रुबी हाॅल क्लिनिक यांच्या मधे एक सामंजस्य करार करण्यात आला.