*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**ओला दुष्काळ असलेल्या भागातील शेतकऱ्यांना बळ दे ; आमदार हेमंत रासने यांची काली माते चरणी प्रार्थना**श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न*
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*
*श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न*
पुणे :
राज्यातील 13 जिल्ह्यात ओला दुष्काळ पडलेला आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जगण्याचे बळ दे अशी प्रार्थना आमदार हेमंत रासने यांनी काली मातेच्या चरणी केली.
बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी आमदार हेमंत रासने बोलत होते. हा कार्यक्रम आर.सी.एम गुजराती शाळा ,फडके हौद चौक,कसबा पेठ,पुणे येथे संपन्न झाला.यावेळी मा.नगरसेवक विशाल धनवडे,दत्ता देवकर,गजराज चोक्सी,महेंद्र सोलंकी,अरविंद कोठारी,तुषार रायकर ,पुणे शहर सार्वजनिक काली पूजा कमिटीचे सेक्रेटरी सुब्रतो मजुमदार, विनोद संतरा- खजिनदार ,अमर माझी-उपसेक्रेटरी ,अनुप माईती - सदस्य , महादेव माझी - सदस्य ,पूनचंद्र दास- सदस्य, संकेत मजुमदार आदि मान्यवरांसाह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच आदिती चक्रवर्ती , पार्थ दत्त, आनंदिता चंदा यांनी गायन कला सादर करत उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली,
पुढे बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, कोलकाता मधून पुण्यात आलेल्या काम करणाऱ्या सुवर्ण कारागिरांनी या महोत्सवाची सुरुवात केली होती. पुण्यातील बंगाली समाजासह विविध धर्मीय व सांस्कृतिक घटकांना एकत्र आणणारा हा उत्सव गेल्या पंचवीस वर्षांपासून सामाजिक ऐक्य, भक्ती आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम साधत आला आहे. आज हा उत्सव पुण्याच्या मातीचा झाला आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
या रक्तदान शिबिरात शंभरहून अधिक बाटल्यांचे संकलन करण्यात आले.