*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**जुन्या व नव्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आपला पक्ष वाढवायचा आहे* : *उपमुख्यमंत्री अजित पवार*
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*
*जुन्या व नव्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आपला पक्ष वाढवायचा आहे* :
*उपमुख्यमंत्री अजित पवार*
पुणे,
शहर प्रतिनिधी : पुणे शहराला ऐतिहासिक वारसा आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात राज्याच्या तसेच देशाच्या अन्य भागातून अनेक नागरीक विविध कारणास्तव वास्तव्यास आले आहेत. या सर्वांना नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशिल असून, अशावेळी जुन्या व नव्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सरचिटणीस सदानंद शेट्टी व माजी नगरसेविका सुजाता शेट्टी यांच्यासह, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते भीमराव पाटोळे, देविका शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, विनोद काळोखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे रोख रक्कमेसह, अन्न धान्य वितरित केले. पुणे पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन, रिंग रोडचा प्रश्न सुटावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मित्रानो आम्ही कामाची माणसे आहोत म्हणून सकाळी सहा ला कामाला लागतोय. माणसे जोडली गेली पाहिजे, सर्व समाज पुढे गेला पाहिजे हा आमचा विचार आहे. विकासाच्या वाटेवर आमचा पक्ष नेहमी चालत राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कष्टकरी, दुर्बल, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाच्या बरोबर राहिल याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
सदानंद शेट्टी म्हणाले, ६९४ सदनिका मी एस आर ए च्या माध्यमातून घरे दिली. पण माझ्या विरोधात नेहमी राजकारण केले गेले. गेली ३७ वर्षे आम्ही शेट्टी कुटुंबीय महापालिकेत काम करत आहोत. स्थायी समिती अध्यक्ष असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारले.नेहमी समाजासाठी काम केले त्याची पावती म्हणून या निवडणुकीत आमच्या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल निवडून आणू असा शब्द शेट्टी यांनी यावेळी दिला.
सदानंद शेट्टी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे आमची शहरातील ताकद वाढली आहे. कल्पकता असलेले कर्तव्यदक्ष नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. त्यांनी महापालिकेच्या माध्यमाद्वारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले, शहरातील पहिला सिमेंट काँक्रीट रस्ता त्यांच्या कार्यकाळात अस्तित्वात आला.
यावेळी सुजाता शेट्टी, भीमराव पाटोळे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमात अजित पवार यांच्या हस्ते ३३५ एस आर ए च्या प्रकल्पातील घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना देण्यात आल्या.