*पुणे प्रवाह नृत्य अधिकृत ब्लॉग्स पेज**बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय तातडीने सुरू करावे* – *अभिजीत सिद्धार्थ वाघमारे यांची मागणी*
*पुणे प्रवाह नृत्य अधिकृत ब्लॉग्स पेज*
*बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय तातडीने सुरू करावे* – *अभिजीत सिद्धार्थ वाघमारे यांची मागणी*
पुणे :
बोपोडी परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर बोपोडी येथील अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले संजय गांधी रुग्णालय तातडीने सुरू करण्यात यावे, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), पुणे शहर, चित्रपट, साहित्य, कला व संस्कृती विभागाचे उपाध्यक्ष अभिजीत सिद्धार्थ वाघमारे यांनी केली आहे.
या संदर्भात विधानसभेचे सदस्य रोहित पवार यांनी पुणे महानगरपालिकेकडे निवेदन सादर करून रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या मागणीला अभिजीत वाघमारे यांनीही जोरदार पाठिंबा दर्शविला आहे.
बोपोडी परिसर हा पुण्याचा प्रवेशद्वार असल्याने येथे कामगार, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. आरोग्य सुविधा बंद असल्याने लहानशा आजारासाठी देखील नागरिकांना दूरवरच्या खासगी रुग्णालयात जावे लागते. यामुळे त्यांच्या वेळेचा आणि पैशाचा प्रचंड अपव्यय होतो.
“सार्वजनिक आरोग्य हा प्रत्येकाचा मुलभूत हक्क आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय सुरू करावे, हीच जनतेची मागणी आहे,” असे मत अभिजीत सिद्धार्थ वाघमारे यांनी स्पष्ट केले.