*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व संबधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे* -*जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*
*मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व संबधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे* -
*जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*
पुणे, दि. 19:
जिल्ह्यात धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे बाधित होणारे पुरग्रस्त भाग तसेच दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थालंतर करावे, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व संबधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, पुणे महानगरपालिका, प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम मंडळ जलसंपदा, आरोग्य, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, सैन्यदल, नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आदी सर्व संबधित विभागाचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
श्री. डुडी म्हणाले, भारतीय हवामान खात्याने आज (दि.19 ऑगस्ट) आणि उद्या (दि. 20 ऑगस्ट) रोजी घाटमाथा परिसरात रेड अलर्ट तर शहर आणि ग्रामीण भागात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जी धरणे भरली आहेत त्या ठिकाणी जलसंपदा व शासकीय यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. जलसंपदा विभागाने पाऊसाचा अंदाज आणि त्यांनी धरणातील आवक लक्षात घेता विसर्गाबाबत नियोजन करावे. याबाबत किमान दोन तास अगोदर जिल्हा नियंत्रण कक्षास कळवावे.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, सैन्यदलानी आपली पथके सुसज्ज साहित्यासह दक्ष ठेवावे. नदीकाठच्या लोकांना ज्या ठिकाणी धोका पोहोचण्याची शक्यता आहे, त्यांना सावध करण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत संदेश पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना खबरदारी घ्यावी, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले.
यावेळी सर्व संबंधित यंत्रणेने मान्सूनच्या अनुषंगाने पुर्वतयारी व करीत असलेली कार्यवाहीबाबत माहिती दिली.
0000