*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**ज्योतिष अधिवेशनात विलास बाफना यांचा सत्कार*
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*
*ज्योतिष अधिवेशनात विलास बाफना यांचा सत्कार*
पुणे:
भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आयोजित ४३ व्या दोन दिवसीय अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचा समारोप २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी झाला.यावेळी ज्येष्ठ ज्योतिषी विलास बाफना यांचा ग्रहांकित चे संपादक चंद्रकांत शेवाळे, सौ. पुष्पलता शेवाळे यांच्या हस्ते ज्योतिष क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
महालक्ष्मी मंगल कार्यालय (मित्रमंडळ,पर्वती) येथे झालेल्या अधिवेशनात देशभरातील नामवंत ज्योतिर्विद सहभागी झाले होते.
डॉ. बाफना हे हस्तसामुद्रिक ज्योतिष क्षेत्रात ६० वर्षे कार्यरत आहेत.महाराष्ट्र शासनात त्यांनी जलसंपदा उभारणी क्षेत्रातही योगदान दिले आहे.रेकी हीलिंग चे अनेक चर्चासत्रे त्यांनी घेतली आहेत. विस्तृत लेखन केले आहे.हजारो व्यक्तींना हात पाहून टाईम स्केल अनुमान पद्धती, स्पेशल पाम फॉर्मेशन, ऑरा रिडिंग, डाऊझिंग, रेकी हीलिंग विषयक मार्गदर्शन केलेले आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
सत्कार प्रसंगी रजनी साबडे, उल्हास पाटकर,नवीनभाई शहा,जयश्री बेलसरे हे मान्यवर उपस्थित होते.