*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**पुणेकरांसमोर उलगडली देशाचा अभिमान ठरलेल्या "चिनाब ब्रिज"ची जन्मकथा**प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनच्या तसेच सह आयोजक अल्ट्रा टेक, बीएनसीए,आयसिआय, एईएसए, आयजीएस यांच्या वतीने आयोजन*
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*
*पुणेकरांसमोर उलगडली देशाचा अभिमान ठरलेल्या "चिनाब ब्रिज"ची जन्मकथा*
*प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनच्या तसेच सह आयोजक अल्ट्रा टेक, बीएनसीए,आयसिआय, एईएसए, आयजीएस यांच्या वतीने आयोजन*
पुणे :
जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर नव्याने बांधण्यात आलेला चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे, जो चिनाब नदीपासून ३५९ मीटर वर आहे आणि त्याची लांबी १३१५ मीटर आहे, तासाला २६६ किमी वेगाने आलेले वारे सहन करण्याची क्षमता असलेल्या या जागतिक आश्चर्य, देशाचा अभिमान ठरलेल्या या पुलाच्या अंतरंगांची आणि बांधकामाची अनोखी कथा आज पुणेकरांसमोर उलगडण्यात आली.निमित्त होते पुणे प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारताचा अभिमान "चिनाब ब्रिज" या विशेष चर्चासत्राचे.
बीएनसीए, कर्वे नगर, पुणे येथे विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी इंजि. विकास रामगुडे(जॉईंट एम.डी एमएसआयडीसी, महाराष्ट्र सरकार), डॉ. सुनील बसारकर (अभियंता)(आयकॉनिक चिनाब रेल्वे ब्रिज चे भूगर्भ तंत्रज्ञान), ब्रिज इंजि. शशांक राजभोज(चिनाब आर्च ब्रिजचे डिझाइन आणि बांधकाम),कार्यक्रम समितीचे अध्यक्ष, इंजि. नारायण कोचक, पुणे प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शेषराव कदम,सचिव अजय कदम आदि मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना इंजि. विकास रामगुडे म्हणाले, आज पीएसईए च्या वतीने एक वेगळा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, अनेकदा इंजिनियरला कमी लेखल्याची तक्रार असते मला वाटते या चर्चासत्रात सादर करण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मधून स्ट्रक्चरल इंजिनियरचे काम किती महत्वाचे असते हे दिसून आले आहे.
डॉ. सुनील बसारकर म्हणाले, आजच्या चर्चासत्रातून ऐतिहासिक आणि जागतिक आश्चर्य ठरलेल्या चिनाब ब्रिजची जन्मकथा सांगताना मला वाटते ही एक इंजिनियरिंग विश्वातील महत्वपूर्ण घटना आहे. अनेक नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कार या पुलाच्या बांधकाममध्ये झाला आहे. २००३ साली मंजूर करण्यात आलेल्या पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला २००४ मध्ये सुरुवात झाली २०२० ते २०२२ या कोविड काळात हा पूल करण्यासाठी अनेक संकटांचा सामान्य करावा लागला,अनेक आव्हानांचा प्रतिकार करत हा ऐतिहासिक पूल निर्माण करण्यात आला.
इंजि. शशांक राजभोज म्हणाले,चिनाब ब्रिज हा जगात सर्वात मोठा पूल आहे. या उभारणीत आलेल्या अडचणी, आव्हाने मोठी होती, या निर्माणाचा मी एक भाग होतो, हा पूल उभारणे मोठे आव्हान होते, जिथे वाहतूक व्यवस्था नाही, पूलाची ऊंची, पूल उभरण्यात आलेला भूभाग या सर्वच बाबी म्हणजे एक अत्यंत खडतर प्रवास होता, ३० -३० टन वाजनांचे सेगमेंट्स त्या ठिकाणी उभारणे किती कौशल्याचे होते याची माहिती सांगताना माझ्या या पुलाच्या उभारणीतील आठवणींना उजाळा मिळाला.
शेषराव कदम म्हणाले,पीएसईए तर्फे एक तंत्रज्ञान उलगडणारा परिसंवाद आयोजित करण्यात आला.मुळात संस्थेची स्थापनाच आमच्या व्यवसायातील लोकांना आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवणे आणि सर्वाना एकत्र आणणे हा आहे. आज इंजिनियर, आर्किटेक्ट आणि विद्यार्थ्यांच्या मिळालेल्या प्रतिसदाने आम्ही भारावून गेलो आहोत, भविष्यात अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही घ्यावेत यासाठी प्रेरणा यातून मिळाली असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही,
अजय कदम म्हणाले, पीएसईए ही संस्था आम्ही नव्याने सुरू केली असली तरी यातील सर्व संस्थापक हे अनुभवी आहेत. ३० ते ३५ वर्षांचा अनुभव त्यांचा आहे, स्ट्रक्चरल इंजिनिअर्स च्या समोरील आव्हाने आणि नवीन तंत्रज्ञान याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यात पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या प्रॉजेक्ट बद्दल आशा पद्धतीचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.आजच्या परिसंवाद कार्यक्रमाला पुणेकर,वरिष्ठ प्रॉजेक्ट मॅनेजर्स, जेसीबी सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यां मधील अनुभवी तज्ञ इंजिनियर्स व काही कन्स्ट्रक्शन उपकरणे बनवणारे मेकॅनिकल इंजिनियर्स,विद्यार्थी, पुणे, सातारा, मुंबई येथील स्ट्रक्चरल इंजिनियर्स, बांधकाम व्यावसायिक,बिल्डर्स यांनी सहभाग घेतला यांचा मिळालेला प्रतिसाद आम्हाला प्रेरणा देणार आहे. तसेच अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापक व होतकरू विद्यार्थ्यांचा समावेश PSEA संस्थेच्या प्रशासकीय समितीस आशादायक व उत्साहवर्धक वाटला.