*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**मेट्रोच्या खांबांच्या सळया काढण्यात यावे**सुहास भगवानराव निम्हण**(शहर उपाध्यक्ष : छ. शिवाजीनगर/कोथरूड वि मतदार संघ)*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*
*मेट्रोच्या खांबांच्या सळया काढण्यात यावे*
*सुहास भगवानराव निम्हण*
*(शहर उपाध्यक्ष : छ. शिवाजीनगर/कोथरूड वि मतदार संघ)*

*पुणे*
आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या हिंजवडी ते छ.शिवाजीनगर या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बाणेर रस्त्यावरून आपण औंध रस्त्याकडे वळण घेतो त्याठिकाणच्या मेट्रोच्या खांबाच्या तळाशी दोन मोठ्या सळया बाहेर आलेल्या आहेत. त्यामुळे वाहनचालक, पादचारी यांचा अपघात होऊन सळयांवर पडून गंभीर दुखापत होऊ शकते याबाबत अनेक विद्यार्थ्यांचे महिला पालक आमच्या कार्यालयात येऊन तक्रारी करत आहेत.  
  मेट्रोच्या कामावेळी अनेक अपघात झाले आहेत व नागरिक पण जखमी झाले आहेत. त्याच्या बातमीचा फोटो मागे दिला आहे. नाहक एखाद्या नागरिकाचा जीव जाऊ नये म्हणून आम्ही हि खबरदारी घेत आहोत. तरी आपणांस विनंती कि २ दिवसात सदर सळया काढून घ्याव्यात व भविष्यात होणारे अपघात टाळावेत.  
येत्या २ दिवसात सदरच्या सळया काढून तेथे दुरुस्ती केली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल. होणाऱ्या नुकसानीस व सदर ठिकाणी काही अनुचित प्रकार घडल्यास आपणास जबाबदार धरले जाईल. याची कृपया आपण नोंद घ्यावी. अशाप्रकारचे निवेदन आम्ही बुधवार दि १३/०८/२०२५ व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, ब्लॉक नंबर ए/२, ए /३, जिल्हा न्यायालय मेट्रो रेल्वे स्थानक, न्यायमूर्ती रानडे पथ, शिवाजीनगर, पुणे-०५,यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, शिवाजीनगर उपविभागाध्यक्ष संजय तोडमल, किशोर इंगवले व मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सहकार्य असावे,
कळावे,
                                                                              आपला राष्ट्रबांधव,
 

                                                                         सुहास भगवानराव निम्हण
(शहर उपाध्यक्ष : छ. शिवाजीनगर/कोथरूड वि मतदार संघ)

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*दि २४ मार्च २०२५ रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ग्रँट मेडिकल फाउंडेशन चे रुबी हाॅल क्लिनिक यांच्या मधे एक सामंजस्य करार करण्यात आला.

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**पुण्यात २०२५ पर्यंत केमेस्ट्रीच एक चाप्टर उघडला जाईल**४३ व्या इंडियन काऊंसिल आँफ केमिस्टचा परिपाक*