*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**भव्यदिव्य सेटवर चित्रित होणाऱ्या 'घबाडकुंड'चीच हवा* *भव्यदिव्य, खर्चिक आणि नेत्रदीपक सेटवर सुरुय 'घबाडकुंड'चे चित्रीकरण, कलाकारांची फौज मनोरंजनासाठी सज्ज**पुणे*आयुष्यात आलेल्या कितीही अडचणी आपण पार करत यशाची शिखर गाठलं असलं तरी एकदातरी आपल्याला लॉटरी लागावी, अचानक खात्यात काहीही न करता बक्कळ पैसा यावा वा एखाद घबाड हाती लागावं असं वाटतं. पण या सगळ्या म्हणायच्या गोष्टी आहेत, खऱ्या आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही असं म्हणतात तेच खरं. हो. पण एखाद घबाड हाती लागायची इच्छा काही मनातून जात नाही. अशाच प्रकारच्या घबाडाची आणि त्याचा शोध घेणाऱ्यांची गोष्ट 'घबाडकुंड' या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या लक्षवेधी शीर्षकासह या चित्रपटाचा भव्यदिव्य, खर्चिक, आणि नेत्रदीपक असा सेट अधिक लक्षवेधी ठरला. अर्थात मोठया पडद्यावर हा सेट प्रेक्षकांना नक्कीच खुर्चीत खिळवून ठेवायला मदत करेल.अॅक्शन, विनोद, रहस्य असा सगळा भरगच्च मसाला असलेला 'घबाडकुंड' चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी ट्रीट असणार आहे. 'घबाडकुंड' या चित्रपटाची कथा रहस्यमय असून, यात बऱ्याच् चमत्कारीक गोष्टी घडताना दिसणार आहेत. दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील, निर्माते रसिक कदम आणि सह निर्मात्या स्मिता पायगुडे अंजुटे यांच्या साथीने सस्पेन्स थ्रिलर जॉनर प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. चित्रपटासाठी पुण्याजवळील खेड-शिवापूर येथे सिनेमाचा सेट उभारला आहे. १० ते १२ हजार स्क्वेअर फुटांच्या जागेवर भव्य सेट उभारण्यात आला आहे. या सेटवर पाण्याची कुंड, खोलवर गेलेल्या विहिरी, पुरातन मंदिरे, गुहा, त्यातून जाण्या-येण्याचे मार्ग यांचा वापर गूढ निर्माण करणारी रहस्यमय दृश्ये चित्रीत करण्यासाठी केला जाणार आहे. मराठीत प्रथमच अशाप्रकारे भव्य-दिव्य सेट तयार करण्यात आला आहे.या चित्रपटात रहस्य, थरार, विनोदाच्या जोडीला नात्यांची गुंतागुंतही पाहायला मिळणार आहे. घबाडाचा शोध घेताना अनाहूतपणे एकमेकांवर दाखवला जाणारा अविश्वास आणि त्यातून निर्माण होणारे संशयी वातावरण उत्सुकता वाढवणार आहे. चित्रपटात देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, साहिल अनलदेवर आदि कलाकारांची फौज मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.व्हेलेंटिना इंडस्ट्रीज लि. चे विशेष सहकार्य लाभलेला 'घबाडकुंड' चित्रपट मराठी, हिंदी, तेलगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी संजय नवगिरे, अक्षय धरमपाल यांची आहे. कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांचे आहे. कार्यकारी निर्माता म्हणून आकाश जाधवने बाजू सांभाळली आहे. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी या चित्रपटासाठी साहसदृश्याची जबाबदारी सांभाळली आहे.

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*
*भव्यदिव्य सेटवर चित्रित होणाऱ्या 'घबाडकुंड'चीच हवा* 

*भव्यदिव्य, खर्चिक आणि नेत्रदीपक सेटवर सुरुय 'घबाडकुंड'चे चित्रीकरण, कलाकारांची फौज मनोरंजनासाठी सज्ज*

*पुणे*

आयुष्यात आलेल्या कितीही अडचणी आपण पार करत यशाची शिखर गाठलं असलं तरी एकदातरी आपल्याला लॉटरी लागावी, अचानक खात्यात काहीही न करता बक्कळ पैसा यावा वा एखाद घबाड हाती लागावं असं वाटतं. पण या सगळ्या म्हणायच्या गोष्टी आहेत, खऱ्या आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही असं म्हणतात तेच खरं. हो. पण एखाद घबाड हाती लागायची इच्छा काही मनातून जात नाही. अशाच प्रकारच्या घबाडाची आणि त्याचा शोध घेणाऱ्यांची गोष्ट 'घबाडकुंड' या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या लक्षवेधी शीर्षकासह या चित्रपटाचा भव्यदिव्य, खर्चिक, आणि नेत्रदीपक असा सेट अधिक लक्षवेधी ठरला. अर्थात मोठया पडद्यावर हा सेट प्रेक्षकांना नक्कीच खुर्चीत खिळवून ठेवायला मदत करेल.

अॅक्शन, विनोद, रहस्य असा सगळा भरगच्च मसाला असलेला 'घबाडकुंड' चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी ट्रीट असणार आहे. 'घबाडकुंड' या चित्रपटाची कथा रहस्यमय असून, यात बऱ्याच् चमत्कारीक गोष्टी घडताना दिसणार आहेत.  दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील, निर्माते रसिक कदम आणि सह निर्मात्या स्मिता पायगुडे अंजुटे यांच्या साथीने सस्पेन्स थ्रिलर जॉनर प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत.  चित्रपटासाठी पुण्याजवळील खेड-शिवापूर येथे सिनेमाचा सेट उभारला आहे. १० ते १२ हजार स्क्वेअर फुटांच्या जागेवर भव्य सेट उभारण्यात आला आहे. या सेटवर पाण्याची कुंड, खोलवर गेलेल्या विहिरी, पुरातन मंदिरे, गुहा, त्यातून जाण्या-येण्याचे मार्ग यांचा वापर गूढ निर्माण करणारी रहस्यमय दृश्ये चित्रीत करण्यासाठी केला जाणार आहे. 
मराठीत प्रथमच अशाप्रकारे भव्य-दिव्य सेट तयार करण्यात आला आहे.

या चित्रपटात रहस्य, थरार, विनोदाच्या जोडीला नात्यांची गुंतागुंतही पाहायला मिळणार आहे. घबाडाचा शोध घेताना अनाहूतपणे एकमेकांवर दाखवला जाणारा अविश्वास आणि त्यातून निर्माण होणारे संशयी वातावरण उत्सुकता वाढवणार आहे. चित्रपटात देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, साहिल अनलदेवर आदि कलाकारांची फौज मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.

व्हेलेंटिना इंडस्ट्रीज लि. चे विशेष सहकार्य लाभलेला 'घबाडकुंड' चित्रपट मराठी, हिंदी, तेलगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी संजय नवगिरे, अक्षय धरमपाल यांची आहे. कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांचे आहे. कार्यकारी निर्माता म्हणून आकाश जाधवने बाजू सांभाळली आहे. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी या चित्रपटासाठी साहसदृश्याची जबाबदारी सांभाळली आहे.

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*दि २४ मार्च २०२५ रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ग्रँट मेडिकल फाउंडेशन चे रुबी हाॅल क्लिनिक यांच्या मधे एक सामंजस्य करार करण्यात आला.

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**पुण्यात २०२५ पर्यंत केमेस्ट्रीच एक चाप्टर उघडला जाईल**४३ व्या इंडियन काऊंसिल आँफ केमिस्टचा परिपाक*