*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**11 गणेश मंडळांचा चौथ्या वर्षी यशस्वी संयुक्त मिरवणूक* *:मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा गौरव रथ ठरेल आकर्षक**:500 मराठी शिक्षकांचा होणार सन्मान* *:10 हजार पुस्तकांचे होईल वितरण*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*

*11  गणेश मंडळांचा चौथ्या वर्षी यशस्वी संयुक्त मिरवणूक* 

*:मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा गौरव रथ ठरेल आकर्षक*
*:500 मराठी शिक्षकांचा होणार सन्मान* 
*:10  हजार पुस्तकांचे होईल वितरण*


पुणे, २४ ऑगस्ट: 
बुद्धीच्या देवतेला पुस्तकांचा नैवेद्य अर्पण करून सलग चौथ्या वर्षी ११ गणेश मंडळांची संयुक्त मिरवणुकीचा यशस्वी प्रयोग शहरात केला जात आहे.
यावर्षीच्या मिरवणुकीची विशेषता म्हणजे मराठी भाषेचा गौरव रथ असेल. या रथामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी व मराठी भाषेला साहित्य, नाटक,  कथा व कवितेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या लेखकांचे त्यांच्या पुस्तकाचे सहचित्र या रथात असणार आहे.  या मिरवणुकीत 500 मराठी भाषा शिक्षकांचा सहभाग असून यांचा सन्मान केला जाणार आहे. त्याचप्रमाणे मिरवणूक मार्गावर 10  हजार मराठी पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. या रथावर ११ गणेश मंडळांचे गणपती विराजमान करून भव्य मिरवणूक काढण्यात येईल. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष  संतोष धनवकडे, अभिषेक तापकीर, उदय जगताप, विजय क्षिरसागर, सुनिल पिसाळ व विश्वस्त अनिरूद्ध येवले यांनी दिली.
शहरातील अन्य गणेश मंडळांनीही एकत्रित येऊन नवा पायंडा घालण्यासाठी हा उपक्रम आहे. त्यामुळे अशी चळवळ पुढे चालण्याचे आवाहन या परिषदेत करण्यात आले.
एकत्रित सार्वजनिक मिरवणूकीत धनकवडी येथील साईनाथ मित्र मंडळ, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, केशव मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ , एकता मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ, आणि अखिल मोहन नगर मित्र मंडळ यांच्या सारख्या ११ गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन देशातील सर्वात मोठ्या एकत्रित मिरवणूकीचे आयोजन बुधवार, 27 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते सायं. 5 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या मध्ये जवळपास 8  ते 10 हजार नागरिक सहभागी होणार आहेत. ही मिरवणूक गुलाबनगर, धनकवडी येथून सुरू होऊन धनकवडी गाव, केशव कॉम्प्लेक्स, विद्यानगरी शिवशंकर चौक ते मोहनगर येथे काढण्यात येत आहे. यामध्ये ज्ञान प्रबोधनीचा पथक असणार आहे

मिरवणूकीच्या प्रारंभी महाराष्ट्र भाषेला मिळालेला अभिजात दर्जा, मराठी साहित्य क्षेत्रात ज्यांनी नावलौकिक केले अशा लेखकांची यशोगाथा, मराठी साहित्याला जागतिक दर्जावर पोचविणारे लेखकांची माहिती येथे उपस्थित गणेश भक्तांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व मंडळांच्या सहयोगाने संपूर्ण वर्षभर समाजउपयोगी कार्यक्रम चालविले जाणार आहेत. त्यामुळे या कार्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा. गेल्या वर्षी धनकवडी मध्ये ११ गणेश मंडळांनी एकत्रित येऊन मिरवणूकीचा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला होता. या वर्षी याच कार्याची रेघ पुढे ओढत ११ गणेश मंडळांनी सहभाग घेऊन ही मिरवणूक यशस्वीपणे पुर्ण करण्याचा संकल्प घेतला आहे.
या वेळी प्रतीक कुंभार, उदय गुंड पाटील, विकी सुबागडे, आनंद शिंदे, विशाल निगडे, उदय भोसले, सोमनाथ शिर्के, शंतनू येवले, मनोज शिंदे, विजय क्षीरसागर व अन्य मंडळाचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*दि २४ मार्च २०२५ रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ग्रँट मेडिकल फाउंडेशन चे रुबी हाॅल क्लिनिक यांच्या मधे एक सामंजस्य करार करण्यात आला.

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**पुण्यात २०२५ पर्यंत केमेस्ट्रीच एक चाप्टर उघडला जाईल**४३ व्या इंडियन काऊंसिल आँफ केमिस्टचा परिपाक*