*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू**वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*
*गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू*
*वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा*

*मुंबई*


मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गश्मीरने चित्रपट, हिंदी मालिका, नृत्यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. आता गश्मीर लेखक-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे, त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याने त्याच्या या पहिल्या चित्रपटाच्या मुहूर्ताची सोशल मीडियावर घोषणा केली. जीआरम्स इव्हेंट्स अँड प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. 

या चित्रपटाचे निर्माते गौरी महाजनी, माधवी महाजनी आणि गश्मीर महाजनी असून लेखन व दिग्दर्शन गश्मीर स्वतः करत आहे. अभिनय क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असलेला गश्मीर आता कॅमेऱ्यामागे जाऊन एक नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण सुप्रसिद्ध डीओपी सत्यजीत शोभा श्रीराम यांच्या कॅमेऱ्यातून साकारले जात आहे. गश्मीरच्या या नव्या इनिंगबद्दल मराठी सिनेसृष्टीतूनही शुभेच्छांचा वर्षाव होत असून या चित्रपटाचं नाव आणि कलाकार  जाणून घेण्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

आपल्या या नवीन प्रवासाविषयी गश्मीर महाजनी म्हणतो, “दिग्दर्शन हे माझं एक दीर्घकाळापासूनचं स्वप्न आहे. अभिनय करताना अनेक गोष्टी शिकल्या, अनुभवल्या आणि आत खोलवर काही सांगायचं राहून गेलं होतं. आता त्या भावना, ती विचारांची प्रक्रिया मी कॅमेऱ्याच्या मागून मांडणार आहे. चित्रपट ही एक सामूहिक कला आहे, मात्र काही कथा अशा असतात, ज्या फक्त आपल्या दृष्टिकोनातूनच सांगितल्या जाऊ शकतात. माझा हा चित्रपट म्हणजे माझ्या मनात कित्येक वर्षांपासून रुजत गेलेली कल्पना आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने ही गोष्ट सुरू करत असल्यामुळे हे एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण आहेत. ही जबाबदारी मोठी आहे, परंतु प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम हेच माझं बळ आहे.”

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**पुण्यात २०२५ पर्यंत केमेस्ट्रीच एक चाप्टर उघडला जाईल**४३ व्या इंडियन काऊंसिल आँफ केमिस्टचा परिपाक*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*दि २४ मार्च २०२५ रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ग्रँट मेडिकल फाउंडेशन चे रुबी हाॅल क्लिनिक यांच्या मधे एक सामंजस्य करार करण्यात आला.