*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**डॉ. श्याम मुडे फर्ग्युसनचे प्राचार्य* *डॉ. श्याम मुडे यांची डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे* *(स्वायत्त) अठरावे प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.*
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*
*डॉ. श्याम मुडे फर्ग्युसनचे प्राचार्य*
*डॉ. श्याम मुडे यांची डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे* *(स्वायत्त) अठरावे प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.*
*पुणे*
मुडे यांनी भूगर्भशास्त्र या विषयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पी. एचडी. पदवी संपादन केली आहे. शिक्षण, संशोधन आणि अध्यापनाच्या माध्यमातून भूगर्भशास्त्र या विषयात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे पन्नासहून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. सन 2022 पासून ते फर्ग्युसनच्या भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आयएनएसए सायंटिस्ट आणि शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सहयोगी संशोधनासाठी त्यांनी तैवान मधील राष्ट्रीय चुंग चेंग विद्यापीठातील पृथ्वी आणि पर्यावरण विज्ञान विभागाला भेट देऊन या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे.
जागतिक शिक्षण आणि उद्योगांच्या मागणीनुसार कौशल्याधारित अभ्यासक्रम, भारतीय ज्ञान प्रणालीचे सक्षमीकरण आणि जगभरातील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक आणि उच्च गुणवत्तेचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात मिळावे या उद्देशाने कार्यरत राहणार असल्याचे डॉ. मुडे यांनी सांगितले.