*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**"वनक्षेत्र अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा"; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी**अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी- डॉ. नीलम गोऱ्हे*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*
*"वनक्षेत्र अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा"; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी*

*अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी- डॉ. नीलम गोऱ्हे*

मुंबई, दि. २ एप्रिल २०२५ : राज्यातील वनक्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) यासंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यात हरित लवादाने अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले असून, याबाबत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वनक्षेत्राची टक्केवारी अत्यंत कमी आहे. धाराशिव, बीड, लातूर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये तर वनक्षेत्र १ टक्क्यापेक्षाही कमी आहे. राज्याच्या एकूण भूपृष्ठाच्या सरासरी २० टक्के क्षेत्रावरच वनक्षेत्र आहे, जे आदर्श ३३ टक्क्याच्या निकषाच्या तुलनेत कमी आहे.

या पार्श्वभूमीवर, डॉ. गोऱ्हे यांनी वनमंत्री नाईक यांना विशेष मोहिम आखून तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. तसेच, अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**नवीन मराठी शाळा व साईनाथ ट्रस्टचे आषाढी वारीनिमित्त भव्य रिंगण सोहळ्यात खराखुरा अश्वही धावला*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**बिबवेवाडीतील डोंगरमाथ्याचे आरक्षण उठविण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती* *आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नांना यश*