*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**किल्ले रायगडवर चित्रित झालेल्या ' पोरी आम्ही मराठी पोरी'ला लाभतोय उदंड प्रतिसाद* - *शातिर THE BEGINNING मराठी चित्रपट येत्या 9 मे रोजी होणार प्रदर्शित*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*
*किल्ले रायगडवर चित्रित झालेल्या ' पोरी आम्ही मराठी पोरी'ला लाभतोय उदंड प्रतिसाद* 

- *शातिर THE BEGINNING मराठी चित्रपट येत्या 9 मे रोजी होणार प्रदर्शित*

*रायगड*

सध्या चर्चेत असलेल्या सस्पेन्स थ्रिलर मराठी चित्रपट शातिर THE BEGINNING चे दमदार गीत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. महाराष्ट्राचे तीर्थस्थान असलेल्या किल्ले रायगडावर तब्बल 200 कलाकारांच्या सहभागाने या भव्य गीताचे चित्रीकरण करण्यात आले आहे. 

सावित्रीच्या लेकी आम्ही, शिवबाच्या तलवारी, पोरी आम्ही मराठी पोरी... असे बोल असलेल्या या दमदार मराठमोळ्या गाण्याला समाज माध्यमांमधून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.  या गीतामधून मराठी महिलांच्या कर्तृत्वाची गाथा आणि त्यापासून मराठी पोरींना मिळणारी प्रेरणा दर्शविण्यात आली आहे. 

वैभव देशमुख या चित्रपटाचे गीतकार असून रोहित नागभिडे यांचे संगीत आहे. विख्यात गायिका वैशाली सामंत यांनी या गाण्यांना स्वरसाज चढविला आहे. 

शातिर THE BEGINNING या चित्रपटाची निर्मिती श्रीयांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्स या बॅनरखाली रेश्मा वायकर यांनी केली असून या चित्रपटाद्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. पटकथा सुनील वायकर आणि हेमंत एदलाबादकर यांची आहे. 

या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासह मीर सरवर, योगेश सोमण, रमेश परदेशी, अनिल नगरकर, अभिमन्यू वायकर, वेद भालशंकर, श्रेया कुलकर्णी, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. 

येत्या 9 मे 2025 रोजी शातिर THE BEGINNING हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**नवीन मराठी शाळा व साईनाथ ट्रस्टचे आषाढी वारीनिमित्त भव्य रिंगण सोहळ्यात खराखुरा अश्वही धावला*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**बिबवेवाडीतील डोंगरमाथ्याचे आरक्षण उठविण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती* *आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नांना यश*