*पुणे प्रवाह न्युज अधिकृत ब्लॉग पेज**ब्रह्मोत्सवाला कलश, यज्ञ व गरुड स्थापनेने उत्साहात प्रारंभ**श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन*पुणे : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गरुड स्थापना, कलश स्थापना व यज्ञ स्थापनेने उत्सवाला थाटात प्रारंभ झाला. ब्रह्मोत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली असून विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुजाचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्य जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम होत आहेत. यावेळी विशाल मेहता, रोहित अरोरा, ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल यांच्या हस्ते पूजन झाले. कार्यक्रमाला विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आकर्षक कमान साकारण्यात आली असून विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमामध्ये होम-हवन, महाअभिषेक, अर्चना, पालखी सोहळा व फुलांची होळी तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये उत्सव मूतीर्ची धान्यतुला करुन ते धान्य खडीमशीन येथील कुष्ठरोगी वसाहतीत वाटप अशा उपक्रमांचा समावेश आहे. राजकुमार अग्रवाल म्हणाले, उत्सवाच्या समारोपाच्या दिवशी केशर दूध अभिषेक होणार असून सायंकाळी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. फुलांनी सजविलेल्या पालखी रथातून उत्सवमूर्तींची मिरवणूक काढण्यात येईल. यावेळी पारंपरिक वेशात भाविक सहभागी होणार आहेत. तसेच रात्री पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी होणार आहे. सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून पुणेकरांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.* फोटो ओळ : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गरुड स्थापना, कलश स्थापना व यज्ञ स्थापनेने उत्सवाला प्रारंभ झाला.

*पुणे प्रवाह न्युज अधिकृत ब्लॉग पेज*















*ब्रह्मोत्सवाला कलश, यज्ञ व गरुड स्थापनेने उत्साहात प्रारंभ*

*श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन*


पुणे : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गरुड स्थापना, कलश स्थापना व यज्ञ स्थापनेने उत्सवाला थाटात प्रारंभ झाला. ब्रह्मोत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली असून  विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुजाचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्य जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम होत आहेत. यावेळी विशाल मेहता, रोहित अरोरा, ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल यांच्या हस्ते पूजन झाले. कार्यक्रमाला विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.
 
मंदिराच्या प्रवेशद्वारावर आकर्षक कमान साकारण्यात आली असून विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमामध्ये होम-हवन, महाअभिषेक, अर्चना, पालखी सोहळा व फुलांची होळी तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये उत्सव मूतीर्ची धान्यतुला करुन ते धान्य खडीमशीन येथील कुष्ठरोगी वसाहतीत वाटप अशा उपक्रमांचा समावेश आहे.
 
राजकुमार अग्रवाल म्हणाले, उत्सवाच्या समारोपाच्या दिवशी केशर दूध अभिषेक होणार असून सायंकाळी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. फुलांनी सजविलेल्या पालखी रथातून उत्सवमूर्तींची मिरवणूक काढण्यात येईल. यावेळी पारंपरिक वेशात भाविक सहभागी होणार आहेत. तसेच रात्री पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी होणार आहे. सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून पुणेकरांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

* फोटो ओळ : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गरुड स्थापना, कलश स्थापना व यज्ञ स्थापनेने उत्सवाला प्रारंभ झाला.

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**नवीन मराठी शाळा व साईनाथ ट्रस्टचे आषाढी वारीनिमित्त भव्य रिंगण सोहळ्यात खराखुरा अश्वही धावला*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**बिबवेवाडीतील डोंगरमाथ्याचे आरक्षण उठविण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती* *आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नांना यश*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**पुण्यात २०२५ पर्यंत केमेस्ट्रीच एक चाप्टर उघडला जाईल**४३ व्या इंडियन काऊंसिल आँफ केमिस्टचा परिपाक*