Posts

*पुणे प्रवाह न्यूज*प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय *तुंबाडची मंजुळा* *झी स्टुडिओजच्या नव्या चित्रपटाची घोषणा !**प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित !*

Image
*पुणे प्रवाह न्यूज* प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय          *तुंबाडची मंजुळा*         *झी स्टुडिओजच्या नव्या                             चित्रपटाची घोषणा !* *प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित !* *पुणे* कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो निसर्गरम्य परिसर, नयनरम्य समुद्रकिनारा आणि याचभोवतीने फिरणाऱ्या किती तरी गूढ अशा रहस्यमय कथा आणि सोबतीला गावाकडच्या गजाली. भुता - खेतांवरील चर्चा हा गावाकडच्या माणसांचा कायमच मनोरंजनाचा विषय राहिलेला आहे. यातच वीतभर घडलेल्या गोष्टी हातभर लांब करून सांगणे हा जणू अनेकांचा आवडता छंदच. अशाच काहीशा गूढ वातावरणातली आणि कोकणाच्या परंपरेला साजेशी एक अतिशय रंजक गोष्ट झी स्टुडिओजने आपल्या प्रेक्षकांसाठी आणली आहे. ' तुंबाडची मंजुळा ' असे या चित्रपटाचं नाव असून होळीच्या दिवशी सोशल मीडियावरून या चित्रपटाचं आगळं वेगळं मोशन पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ज्यातून चित्रपटाबद्दलची उत्सुकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. ...

*पुणे प्रवाह न्यूज**लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग**अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न; परिसरात धुराचे मोठे लोट, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम*

Image
*पुणे प्रवाह न्यूज* *लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग* *अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न; परिसरात धुराचे मोठे लोट, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम* *लोणी काळभोर (ता. हवेली, जि. पुणे):*  परिसरातील मुळा-मुठा नदीच्या पात्रात अवैधरित्या स्थानिक पातळीवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या आगीमुळे परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले असून नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न शुक्रवारी उशिरापर्यंत सुरू होते. स्वच्छ भारत मोहिमेच्या पार्श्वभूमीवर देशभरात स्वच्छता आणि नदी संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना, लोणी काळभोर येथे मात्र नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकून तो जाळण्याचा प्रकार अनेकदा उघडकीस आल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती या पुणे शहराला लागून असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायती आहेत. तसेच सदर ग्रामपंचायती या पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे या भागामध्ये शहरीकरण वाढते आहे. सदर महाम...

*पुणे प्रवाह न्यूज**एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे**१५वी ‘भारतीय छात्र संसद’ एमआयटी डब्ल्यूपीयूत**दि. २१ ते २३ फेब्रुवारी या दरम्यान संपन्न होणार*

Image
*पुणे प्रवाह न्यूज* *एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे* *१५वी ‘भारतीय छात्र संसद’ एमआयटी डब्ल्यूपीयूत* *दि. २१ ते २३ फेब्रुवारी या दरम्यान संपन्न होणार* पुणे, दि. १६ फेब्रु.:  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १५वी ‘भारतीय छात्र संसद’ दि.२१ ते २३ फेब्रुवारी २०२६ रोजी कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विवेकानंद सभामंडप, येथे होणार आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विद्यापीठाचे सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, एसओजीचे असोसिएट प्रोफेसर डॉ. परिमल माया सुधाकर, डॉ. हितेश जोशी, प्रोग्रॅम डायरेक्टर डॉ. अभिजित ढेरे, प्रा. गोपाळ वामने व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. १५ व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन, शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वा. होईल. याप्रसंगी वरिष्ठ पत्रकार आणि लेखक पद्मश्री राजदीप सरदेसाई आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे...

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**प्रदूषित पाण्याला पिण्यायोग्य बनवणाऱ्या यंत्रणेचे प्रभावी प्रात्यक्षिक**पुण्यातील डॉ. करण चव्हाण यांचे संशोधन*

Image
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज* *प्रदूषित पाण्याला पिण्यायोग्य बनवणाऱ्या यंत्रणेचे प्रभावी प्रात्यक्षिक* *पुण्यातील डॉ. करण चव्हाण यांचे संशोधन* पुणे:    सध्याच्या काळात अतिशय गंभीर असलेल्या पाणी आणि हवेचे प्रदूषण या समस्यांवर अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे शक्य असल्याचे सिद्ध करणारे प्रात्यक्षिक 'इको आईस'च्या वतीने बोट क्लब येथे आज सादर करण्यात आले. यावेळी प्रोजेक्ट ड्रॉपलेट आणि जलशुद्धी या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. प्रोजेक्ट ड्रॉपलेटद्वारे सौर ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे बोटीचा वापर करून नदी व अन्य जलस्त्रोतांमधील पाण्याची शुद्धता, प्रदूषणाचे प्रमाण आणि अन्य पर्यावरणीय परीक्षण केले जाते. पाण्यातील परिसंस्थेची संबंधित माहिती त्वरित डॅशबोर्डवर उपलब्ध होते. फ्लुईड ऍनालिटिक्सच्या सहकार्याने हा प्रकल्प विकसित करण्यात आला असून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कडून सन 2024 चे को प्रोन्युअर ऑफ द इयर हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे, अशी माहिती 'इको आईस'चे संस्थापक अध्यक्ष डॉ करण चव्हाण यांनी ...

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**शिवसेना शिंदे गटाच्या,शिव उद्योग सहकार सेनेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी सदानंद कडलक यांची निवड*

Image
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज* *शिवसेना शिंदे गटाच्या,शिव उद्योग सहकार सेनेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी सदानंद कडलक यांची निवड* *मुंबई* -  शिवसेना शिंदे गटाच्या,शिव उद्योग सहकार सेनेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी सदानंद कडलक यांची  मा सहसचिव महाराष्ट्र राज्य एकनाथ शेलार,  शिव उद्योग सहकार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामेश्वर वाडेकर व प्रशांत पलांडे कार्यालयीन प्रमुख या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती व शुभहस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून महापालिका निवडणुकीत'ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याला मतदान टाळा' मोहीम*

Image
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज* *हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून महापालिका निवडणुकीत 'ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याला मतदान टाळा' मोहीम* *पुणे* ----------------------------------------- हिंदुत्वाची उपेक्षा कराल, तर हिंदुत्ववादी पुणेकर जागा दाखवतील  किंवा  दहशतवादमुक्त पुण्यासाठी भाजपाची उमेदवार यादी मुस्लिममुक्त हवी अल्पसंख्याकांना खुश करण्यासाठी हिंदुत्वाशी तडजोड करणार्‍यांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा हिंदुत्व जागृती सभेतून इशारा समस्त हिंदू आघाडीतर्फे आयोजित हिंदुत्व जागृती सभेत 'ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याला मतदान टाळा'चा संकल्प पुणे: हिंदुत्वाशी बेईमानी करून सत्तेच्या लालसेपोटी मुस्लिमांचे लाड करणे थांबवा. हिंदू बांधवांवर, हिंदुत्वावर, गोवंशावर वारंवार हल्ले करणाऱ्या, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या शक्तींच्या गळ्यात गळे घालून उमेदवारी देण्याचे प्रयत्न दुर्दैवी आहेत. हिंदुत्ववादी पक्ष म्हणवणाऱ्या भारतीय जनता पार्टीतील काही नेतेमंडळी हिंदुत्वाची उपेक्षा करीत आहेत. गुन्हेगारांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे अस...

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पिंपरी चिंचवड शहर ओबीसी कार्यकारिणी जाहीर*

Image
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज* *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पिंपरी चिंचवड शहर ओबीसी कार्यकारिणी जाहीर* *पिंपरी- चिंचवड* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ओबीसी विभाग पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) वतीने शरातील पदाधिकारी यांची नियुक्ती शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या मार्गदर्शनात  माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते तसेच कार्याध्यक्ष फजल शेख, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड.सचिन औटे यांच्या प्रमुख उपस्थितीत  नुतन कार्यकारिणी पद वाटप समारंभ मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी,पिंपरी येथे पार पडला, यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, संघटन सचिव अशी पदे देण्यात आली असून, ओबीसी विभागाचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची ताकद पक्षास मिळाली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षश्रेष्ठींकडून अभिनंदन करण्यात आले आहे. आगामी काळात जनसंपर्क वाढवणे आणि पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे, असा निर्धार यावेळी सर्व पदाधिकारी यांच्याकडून व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती ओबीसी शहर अध्यक्ष प्रशांत महाजन यांनी यावेळी दिली. तरी सदर बातमीस आपल्या लोकप्रिय प्रसिद्धीमाध्यमातून प्रस...