*साप्ताहिक पुणे प्रवाह**माता रमाई जयंती निमित्त ब्राह्मणगांव येथील भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी नामफलकांचे उद्घाटन संपन्न*



*साप्ताहिक पुणे प्रवाह*

*माता रमाई जयंती निमित्त ब्राह्मणगांव येथील भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी नामफलकांचे उद्घाटन संपन्न*
हरेगांव -

माता रमाई जयंतीनिमित्त भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी व स्त्री गर्जना जागृती महासंघाच्या ब्राह्मणगांव नाम फलकांचे उद्घाटन ब्राह्मणगावचे सरपंच मा. भाऊसाहेब शिंदे व पोलिस पाटील संदीप हरिदास वेताळ या मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. यावेळी सरपंच भाऊसाहेब शिंदे व पोलिस पाटील संदीप वेताळ तसेच महाप्रदेशाध्यक्षा प्रियाताई कर्दळे यांच्या हस्ते सौ. विद्याताई बापू गायकवाड यांची अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रक आणि पक्षाचे पक्षाचे ओळखपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव संतोष सागवेकर, प्रतिक्षा बचत गटाच्या अध्यक्षा सिंधुताई जाधव, मा. सरपंच सरलाताई गायकवाड, अलकाताई गायकवाड, मारियाताई गायकवाड, मंदाताई गायकवाड, इंदुबाई त्रिभुवन, प्रियाताई गायकवाड, मंदाताई जाधव, क्रांताताई गायकवाड, परी गायकवाड, यश, ऋद्र भोसले, स्वरा गायकवाड, मार्केट कमिटीचे अध्यक्ष राधाकृष्ण आहेर, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ गायकवाड, बापू गायकवाड, पद्माकर जाधव, मिलींद त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भोसले, सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी सरपंच भाऊसाहेब शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा विद्याताई गायकवाड यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पोलिस पाटील संदीप वेताळ यांनी माता रमाई यांच्यामुळेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय आणि सामाजिक चळवळीत महान कार्य केले. लोकांच्या उध्दारात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासोबत माता रमाईचे योगदान मोठे आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापू गायकवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन पक्षाचे महासचिव संतोष सागवेकर यांनी मानले.

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्युज अधिकृत ब्लॉग पेज**ईद-ए-मिलाद...* *हजरत मुहम्मद पैगंबर (s.a.s.) यांच्या जयंती निमित्ताने जनवाडी मस्जिद येथे मुस्लिम समाजाच्या वतीने मिठाई वाटप*

*पुणे प्रवाह न्युज अधिकृत ब्लॉग पेज**'मंगळागौरी क्वीन्स स्पर्धा २०२३' थाटात संपन्न* *मंगळागौरी क्वीन्स स्पर्धा २०२३' या भव्य स्पर्धेत गौराई,कात्रज या संघाने प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली*