*पुणे प्रवाह न्युज अधिकृत ब्लॉग पेज**ईद-ए-मिलाद...* *हजरत मुहम्मद पैगंबर (s.a.s.) यांच्या जयंती निमित्ताने जनवाडी मस्जिद येथे मुस्लिम समाजाच्या वतीने मिठाई वाटप*

*पुणे प्रवाह न्युज अधिकृत ब्लॉग पेज*




*ईद-ए-मिलाद...*
 
*हजरत  मुहम्मद पैगंबर (s.a.s.) यांच्या जयंती निमित्ताने जनवाडी मस्जिद येथे  मुस्लिम समाजाच्या 
वतीने मिठाई वाटप*


*पुणे*


*ईद ऐ मिलादुन्नबी*
अखिल मानवजातीला शांती, समता, बंधुत्व आणि सलोख्याची शिकवण देणारे  तसेच आपल्या मातृभूमीवर प्रेम करावे, राष्ट्राप्रमाणेच जगातील सर्व राष्ट्रांवर प्रेम, आपुलकी, मदत, मैत्री करण्याची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे अखेरचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर ( s.a.s) यांची आज जयंती, अर्थात ईद-ए-मिलाद. 
हजरत  मुहम्मद पैगंबर (s.a.s.) यांच्या जयंती निमित्ताने व त्यांनी दिलेल्या शिकवणीचा वारसा पुढे चालवत जनवाडी मस्जिद येथे  मुस्लिम समाजाच्या 
वतीने मिठाई वाटप करून सर्व धर्मियांना शुभेच्छा देण्यात आल्या. 
सदर कार्यक्रमास उपस्थित असलेले जनवाडी मस्जिद ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.रफीक सौदागर सर, रशीद भाई शेख, मा. नगरसेवक आदित्य माळवे उमेश काका वाघ, डॉक्टर शशिकांत चव्हाण, असलम भाई मिरजकर ,लहुजी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ इंगळे, जावेदभाई शेख , पत्रकार अल्ताफभाई पिरजादे, उद्योजक मन्सूर  बागवान ,सामाजिक कार्यकर्ते मोहनजी जाधव, रमाकांत शिंदे, किरणजी ओरसे, सत्तार भाई अत्तार, सिराज भाई मुजावर, सईद खान, हुसेन शेख, इरफान शेख ,रियाज पिरजादे, मोहसीन बागवान, अल्ताफ कुरेशी, वाहीद भाई शेख,, रहमान शेख, बबलू शेख इत्यादी उपस्थित होते
*कार्यक्रमाचे आयोजन* 
युसुफ (बाबा) शेख 
समद शेख 
*यांनी केले*

Popular posts from this blog

*साप्ताहिक पुणे प्रवाह**माता रमाई जयंती निमित्त ब्राह्मणगांव येथील भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी नामफलकांचे उद्घाटन संपन्न*

*पुणे प्रवाह न्युज अधिकृत ब्लॉग पेज**'मंगळागौरी क्वीन्स स्पर्धा २०२३' थाटात संपन्न* *मंगळागौरी क्वीन्स स्पर्धा २०२३' या भव्य स्पर्धेत गौराई,कात्रज या संघाने प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली*