*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**पुण्यातील विद्यार्थ्यांकडून शिक्षणाला रोचक व परस्परसंवादी बनवण्यासाठी ‘लर्निंग इज फन’ नावाच्या शैक्षणिक मंचाची निर्मिती*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*

*पुण्यातील विद्यार्थ्यांकडून शिक्षणाला रोचक व परस्परसंवादी बनवण्यासाठी ‘लर्निंग इज फन’ नावाच्या शैक्षणिक मंचाची निर्मिती*

पुणे - शाळेत ज्या शिकण्याच्या प्रक्रियेला सामोरे जात आहोत ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात बदलण्याची गरज आहे मग वाट बघण्यापेक्षा आपणच  का करू नये असा विचार पुण्यातील पाच शालेय विद्यार्थ्यांच्या मनात आला आणि आता तो प्रत्यक्षात उतरला देखील ! पुण्यातील ११ ते १८ वर्षे वयोगटातील श्रेयस पाटणकर,  शरयू पाटणकर, अर्चित कोरके, रेयांश बारळे  आणि अश्विन म्हसकर या दूरदर्शी बालकांनी शिक्षणाला रोचक आणि परस्परसंवादी बनवण्यासाठी ‘लर्निंग इज फन’ नावाच्या शैक्षणिक मंचाची निर्मिती केली असून या प्रकल्पाची  माहिती या बालकांनी पत्रकार परिषदेत दिली.

"मुलांसाठी, मुलांद्वारे" (For kids, By kids) या अनोख्या तत्त्वावर आधारित या शैक्षणिक मंचा वर अर्थ व्यवस्था, भावनिक बुद्धिमत्ता, आणि मुलांनी अनुभवलेल्या दैनंदिन आव्हानांवर ६० पेक्षा जास्त परस्परसंवादी ई-पुस्तकांचा एक वैविध्यपूर्ण संग्रह उपलब्ध केला आहे.  या ई-पुस्तकांची खासियत म्हणजे तंत्रज्ञान-आधारित दृष्टिकोन, जो शिक्षणाला रोमांचकारी बनवतो. प्रत्येक ई-पुस्तकात  कठिण संकल्पनेला समजण्यासाठी सोप्या कथे चा तसेच सुंदर आणि आकर्षक चित्रे आणि आवाज सुविधा (व्हॉईस-ओवर फीचर) चा वापर करण्यात आला असल्याचे श्रेयस पाटणकर याने सांगितले. हा प्रकल्प कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने बनविण्यात आला असून ई-पुस्तके परस्पर संवादी असल्यामुळे वाचक कथेतील पात्रांशी प्रत्यक्षात संवाद साधू शकतात हे त्याचे वैशिष्ट्य! 

मुलांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विकसित केलेल्या ई पुस्तकाचे प्रात्यक्षिकही दाखवले. यामध्ये फक्त तांत्रिकरित्या माहिती दिली जात नसून कथाकथन, इंटरएक्टिव्ह घटक, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला आनंददायी आणि रोचक बनवण्यास मदत करते. या मुलांचा दृष्टिकोन जितका अभिनव आहे तितक्याच त्यांच्या भविष्यातील योजनादेखील  महत्वाकांक्षी आहेत, ज्यात पुढील वर्षात २०० पेक्षा जास्त ई-बुक्स चे विस्तारीकरण हे त्यांचे लक्ष्य आहे. जे आजच्या बाल शिक्षार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या व्यापक विषयांशी संबंधित असतील.

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**नवीन मराठी शाळा व साईनाथ ट्रस्टचे आषाढी वारीनिमित्त भव्य रिंगण सोहळ्यात खराखुरा अश्वही धावला*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**बिबवेवाडीतील डोंगरमाथ्याचे आरक्षण उठविण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती* *आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नांना यश*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती**एकनाथ शिंदे मुख्यमंत्री*