*पुणे प्रवाह न्युज अधिकृत ब्लॉग पेज**३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे**राज्यपाल मा. रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन !*

*पुणे प्रवाह न्युज अधिकृत ब्लॉग पेज*

*३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे*
*राज्यपाल मा. रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन !*
 
*पुणे*
          कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा गौरवशाली ३५ वे वर्ष साजरे करत असून, याचे उद्घाटन शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वा. महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. रमेश बैस यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल. राज्याचे पर्यटनमंत्री ना. गिरीश महाजन, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री ना. उदय सामंत हे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच खा. रजनी पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, खा. श्रीरंग बारणे, महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी हे या प्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी राज्यमंत्री श्री. रमेश बागवे आणि डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट पुणेच्या अध्यक्षा सौ. अबेदा इनामदार यावेळी उपस्थित होत्या.

          ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमामालिनी यांचा ‘गंगा’ बॅले, लोकप्रिय पार्श्वगायक सोनू निगम म्युझिकल नाईट, ऑल इंडिया मुशायरा, जाणता राजा, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा, महिला महोत्सव, केरळ महोत्सव, कीर्तन महोत्सव, मराठी कवी संमेलन, इंद्रधनु, कथ्थक, भरतनाट्यम, लावणी, विविध नृत्य अविष्कार, मराठी हिंदी गीते या बरोबरच पुणे गोल्फ कप टूर्नामेंट, बॉक्सिंग, कुस्ती व मल्लखांब अशा क्रीडास्पर्धाही यंदाच्या पुणे फेस्टीव्हलची वैशिष्ट्ये आहेत. 

३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे

राज्यपाल मा. रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन !

३५व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना मंगळवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम, पुणे येथे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांच्या हस्ते विधीवत संपन्न होईल. वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरुजी याचे पौरोहित्य करतील. 

            ३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, मायर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत. 

            विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उत्तुंग कामगिरी करणाऱ्या नामवंताना

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**नवीन मराठी शाळा व साईनाथ ट्रस्टचे आषाढी वारीनिमित्त भव्य रिंगण सोहळ्यात खराखुरा अश्वही धावला*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**बिबवेवाडीतील डोंगरमाथ्याचे आरक्षण उठविण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती* *आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नांना यश*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती**एकनाथ शिंदे मुख्यमंत्री*