कृपया प्रसिद्धी साठी -प्राचीन ज्ञान हा आधुनिक विज्ञानाचा आधार आहे. - डॉ. रघुनाथ माशेलकर. पुणे - मॅप एपिक संस्था, जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात " राष्ट्राच्या आणि मुलांच्या जडणघडणीतील गणिताचे स्थान" या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्देश्य विद्यार्थ्यांची गणिताविषयी सकारात्मक मनोधारणा निर्माण व्हावी हे होते. परिषदेनंतर विविध शाळा, शैक्षिणक संस्था, शिक्षक, मुख्याध्यापकांचे "राष्ट्राच्या आणि मुलांच्या जडणघडणीतील गणिताचे स्थान"' या विषयावरील विचार आणि लेख मागविण्यात आले होते त्यातील तज्ञां चे विचार आणि निवडक लेखांच्या पुस्तकाचे अनावरण जेष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते त्यांच्या बाणेर येथील कार्यालयात नुकतेच करण्यात आले. या वेळी मॅप एपिक चे मंदार नामजोशी, निर्मिती नामजोशी, डॉ. प्राची साठे, पूजा जाधव, डॉ. अश्विनी दातार, डॉ. प्रतिक मुणगेकर, वैशाली लोखंडे, ज्ञानेश कुटे आणि पुरषोत्तम बेलवलकर आदी उपस्थित होते. डॉ. माशेलकर यांनी प्रसन्नचित्ताने आपल्या अतिशय आवडत्या गणित विषयाशी संबंधित अंकनाद आणि गणितालय हे मॅप एपिक संस्थेचे प्रकल्प समजून घेतले. खास विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आलेले मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील सांगितिक पूर्णांक आणि अपूर्णांकाचे पाढे ऐकले. विद्यार्थ्यांची जडणघडण, शैक्षिणक समस्या यावर मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर लादलेलं पुस्तकांचं ओझं अनावश्यक असल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, मुलांना बऱ्याच वेळा कमी लेखलं जातं तसं होता कामा नये. मुलांची आकलन शक्ती आपल्या अंदाजा पलीकडची असते. मुलांना सर्व क्षेत्रात मुक्त संचार करू द्यावा. शिक्षणाच्या सद्य परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, अभियांत्रिकी फक्त ठराविक शाखांमध्ये मर्यादित नाही अभियांत्रिकीकडे 'सोल्यूशन इंजिनीअरिंग' या दृष्टीने पहिले पाहिजे. प्राचीन ज्ञान हे आधुनिक विज्ञानाचा आधार आहे. प्राचीन की आधुनिक या वादात न पडता प्राचीन चिकित्सक पद्धती आणि आधुनिक विज्ञान या दोन्हींची सांगड घातल्यास जास्त चांगली परिणामाकता दिसून येईल असे प्रतिपादन डॉ. माशेलकर यांनी केले. ते म्हणाले, भारतात सध्या एकमेकावरील अविश्वास आणि नकारात्मकता दिसत आहॆ जी देशाच्या प्रगतीला बाधक आहॆ. माध्यम समन्वयक,करूणा पाटील,9860402780

*पुणे प्रवाह न्युज अधिकृत ब्लॉग पेज*







*प्राचीन ज्ञान हा आधुनिक विज्ञानाचा आधार आहे. - डॉ.  रघुनाथ माशेलकर*

पुणे - 

मॅप एपिक संस्था, जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि  पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात " राष्ट्राच्या आणि मुलांच्या 
जडणघडणीतील गणिताचे स्थान" या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे  उद्देश्य  विद्यार्थ्यांची गणिताविषयी सकारात्मक मनोधारणा निर्माण व्हावी हे होते. परिषदेनंतर विविध शाळा, शैक्षिणक संस्था, शिक्षक, मुख्याध्यापकांचे  "राष्ट्राच्या आणि मुलांच्या जडणघडणीतील गणिताचे स्थान"' या विषयावरील विचार आणि लेख मागविण्यात आले होते त्यातील तज्ञां चे विचार आणि निवडक लेखांच्या पुस्तकाचे अनावरण जेष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते त्यांच्या बाणेर येथील कार्यालयात नुकतेच करण्यात आले. या वेळी मॅप एपिक चे मंदार नामजोशी, निर्मिती नामजोशी, डॉ. प्राची साठे, पूजा जाधव, डॉ. अश्विनी दातार, डॉ. प्रतिक मुणगेकर, वैशाली लोखंडे, ज्ञानेश कुटे आणि पुरषोत्तम बेलवलकर  आदी उपस्थित होते. 

डॉ.  माशेलकर यांनी प्रसन्नचित्ताने आपल्या अतिशय आवडत्या गणित विषयाशी संबंधित अंकनाद  आणि गणितालय हे मॅप एपिक संस्थेचे प्रकल्प समजून घेतले. खास विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आलेले मराठी, हिंदी आणि  इंग्रजी भाषेतील सांगितिक पूर्णांक आणि अपूर्णांकाचे पाढे ऐकले. विद्यार्थ्यांची  जडणघडण, शैक्षिणक समस्या यावर मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर लादलेलं पुस्तकांचं ओझं अनावश्यक असल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, मुलांना बऱ्याच वेळा कमी लेखलं जातं तसं होता कामा नये. मुलांची आकलन शक्ती आपल्या अंदाजा पलीकडची असते. मुलांना सर्व क्षेत्रात मुक्त संचार करू द्यावा. शिक्षणाच्या सद्य परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, अभियांत्रिकी फक्त ठराविक शाखांमध्ये मर्यादित नाही अभियांत्रिकीकडे 'सोल्यूशन इंजिनीअरिंग' या दृष्टीने पहिले पाहिजे. प्राचीन ज्ञान हे आधुनिक विज्ञानाचा आधार आहे. प्राचीन की आधुनिक या वादात न  पडता प्राचीन चिकित्सक पद्धती आणि आधुनिक विज्ञान या दोन्हींची सांगड घातल्यास जास्त चांगली परिणामाकता दिसून येईल असे प्रतिपादन डॉ. माशेलकर यांनी केले. ते  म्हणाले, भारतात सध्या एकमेकावरील अविश्वास आणि नकारात्मकता दिसत आहॆ जी देशाच्या प्रगतीला बाधक आहॆ. 

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**नवीन मराठी शाळा व साईनाथ ट्रस्टचे आषाढी वारीनिमित्त भव्य रिंगण सोहळ्यात खराखुरा अश्वही धावला*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**बिबवेवाडीतील डोंगरमाथ्याचे आरक्षण उठविण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती* *आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नांना यश*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती**एकनाथ शिंदे मुख्यमंत्री*